Breaking

Thursday, January 20, 2022

लोखंडी खाबांच्या छिद्रात अडकला साप; निघता निघत नव्हता आणि... https://ift.tt/3fGaOkj

खोपोली: एका खांबाच्या छिद्रात अडकलेल्या सापाला सर्पमित्रांनी अथक प्रयत्नांनी सुखरुप बाहेर काढत जीवदान दिले. खोपोलीतील ऋषिवन रिसॉर्टमध्ये माळी काम करणाऱ्या महिलेने एका खांबाजवळ बराच वेळ सापाची वळवळ होताना पाहिली. तिने सुरक्षारक्षकांना पाचारण केले असता एक खांबाच्या होलमध्ये शिरला होता, मात्र त्याचे शरीर त्यामध्ये अडकले होते. सापाने बराच वेळ बाहेर पडण्याची धडपड केल्याने त्याला जखमही झालेली होती. जखमेमुळे साप आतही जाऊ शकत नव्हता व बाहेर पडू शकत नव्हता. मात्र, सर्पमित्रांनी शक्कल लढवत या अडकलेल्या सापाची सुखरूप सुटका केली. (the rescued the trapped in the hole of the iron pole) तेथील सुरक्षारक्षकांनी दिनेश ओसवाल यांना याबाबतीत कळवले. दिनेश ओसवाल यांनी त्या सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या लक्षात आले की, तशा अवस्थेत बाहेर काढणे त्या सापाच्या जीवाला घातक ठरणारे होते. त्यानी समयसुचकता दाखवत इतर सर्प मित्रांना या सापाला वाचवण्यासाठी मदतीस येण्यास सांगितले. वाचा- नवीन मोरे, अमोल ठकेकर, गुरुनाथ साठेलकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केल्यानंतर खांब कापण्याशिवाय पर्याय नव्हता या निर्णयावर पोहचले मात्र खाबं कापणे कठिण होते. साठेलकर यांनी सर्व यंत्रसामुग्री मागवुन सर्वाच्या मदतीने त्या सापाला ईजा होऊ नये याची दक्षता घेत काळजीपूर्वक लोखंडी खांब कापला. वाचा- एरव्ही साप दिसताच भंबेरी उडते. मात्र या रेस्क्यू ऑपरेशनच्या वेळी रिसॉर्टचे कर्मचारी आणि खुद्द मालक देखील तो साप वाचावा म्हणून जणू प्रार्थना करत होते. साधारणपणे तासाभराच्या शिकस्तीनंतर शेवटी त्या सापाला सुखरुप सोडवण्यात यश आले. त्यानंतर सापावर प्राथमिक उपचार करून त्याची जखम बरी होईपर्यंत स्वतः त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सर्पमित्रांनी केली. त्या जातीच्या सापावर दुर्दैव घोंगावत होते. मात्र सर्प मित्रांच्या जिद्दीपुढे काळ नमला होता. वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3Ku1Nc8

No comments:

Post a Comment