Breaking

Saturday, January 1, 2022

लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू; 'या' राज्याने उचलले सर्वात मोठे पाऊल https://ift.tt/3FOcO5d

गुरुग्राम: व्हेरिएंटचं संकट गडद होत चाललं आहे. देशातील अनेक राज्यांत गेल्या काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे संकट पुन्हा एकदा घोंगावू लागले असून सरकारने तर आज नवीन गाइडलाइन्स जारी करत राज्यातील पाच प्रमुख जिल्ह्यांत लागू केले आहेत. पुढील दहा दिवसांसाठी हे निर्बंध असणार आहेत. वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याच्या उद्देशाने सरकारकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. ( ) वाचा: हरयाणात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी राज्यात २६ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ६३ झाली आहे. दुसरीकडे दैनंदिन करोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत चालली आहे. ३० डिसेंबर रोजी राज्यात २१७ तर ३१ डिसेंबर रोजी ४२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ही स्थिती लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने मोठी पावले टाकत निर्बंध कडक केले आहेत. , फरीदाबाद, अंबाला, पंचकुला आणि सोनीपत या पाच प्रमुख जिल्ह्यांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. २ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. वाचा: हरयाणातील या पाचही जिल्ह्यांत पुढील १० दिवस सर्व शाळा-कॉलेज, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुकाने तसेच शॉपिंग मॉल सायंकाळी पाच वाजेपर्यंतच खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांबाबतही नवे निर्देश दिले गेले असून या कार्यालयांत ५० टक्केपेक्षा अधिक उपस्थिती असू नये, असे बजावण्यात आले आहे. याआधी गेल्याच आठवड्यात संपूर्ण राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qHqSHj

No comments:

Post a Comment