Breaking

Saturday, January 22, 2022

गोव्यात काँग्रेस नेते चिदम्बरम भाजपला जिंकून देणार? म्हणाले, 'मी तर...' https://ift.tt/3FQnD63

नवी दिल्ली : गोवा विधानसभा निवडणुकीवरून राजकारण तापलं आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीसाठी ३४ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षातील नाराज नेते राजीनामा देत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीता फॉर्म्युला गोव्यात निवडणुकीपूर्वी यशस्वी न ठरल्याने शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसने युती केली आहे. तर काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस आमने-समाने आहेत. यावरून आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृमणूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी चिदम्बरम यांच्यावर शनिवारी गंभीर आरोप केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाल्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम त्याला जबाबदार असतील, असा आरोप अभिषेक बॅनर्जी यांनी केला आहे. एवढचं नव्हे तर काँग्रेस जनतेची दिशाभूल करत आहे, असंही अभिषेक बॅनर्जी बोलले. चिदम्बरम यांनी थेट उत्तर न देताच लगावला टोला... अभिषेक बॅनर्जी यांच्या आरोपांना पी. चिदम्बरम यांनी थेट उत्तर दिलं नाही. पण न बोलून त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. इतर पक्षांचे सरचिटणी असलेल्यांसोबत आरोप-प्रत्यारोपांच्या शब्दीक चकमकीत आपल्याला पडायचे नाही. मी काँग्रेसचा एक विनम्र कार्यकर्ता आहे, असं पी. चिदम्बरम म्हणाले. उत्पल पर्रीकर भूमिकेवर ठाम दुसरीकडे, भाजपने पणजीतून उमेदवारी न दिल्याने मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. पणजीबाबतची आपली एक तत्त्वनिष्ठ भूमिका आहे. पणजीसाठी भाजपने प्रामाणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला उमेदवार उभा केल्यास आपली माघार घेण्याची तयारी आहे, असे शुक्रवारीच स्पष्ट केल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3KBYy2a

No comments:

Post a Comment