Breaking

Friday, January 21, 2022

राज्यात आज १४४ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची नोंद, सर्वाधिक रुग्ण पुण्यात https://ift.tt/3G2CU41

मुंबई: राज्यात आज शुक्रवारी १४४ बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये आजही सर्वाधिक रुग्णसंख्या ही महापालिका क्षेत्रातील आहे. पुण्यात आज १२४ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली. ( maharashtra registered 144 new cases today and pune registered 124 in a day) आज सापडलेल्या रुग्णांपैकी सोलापूरमध्ये ८, पुणे ग्रामीणमध्ये ६ रुग्ण, तर परभणी, जळगाव, , रायगड, सातारा आणि बीड या जिल्ह्यात प्रत्येकी १ ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आतापर्यंत एकूण २ हजार ३४३ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार १७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ९८९ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी ६८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडमध्ये ११८, नागपुरात ११६, पुणे ग्रामीणमध्ये ६२, सांगलीत ५९, मीरा-भाईंदरमध्ये ५२, ठाणे महापालिका क्षेत्रात ५०, अमरावतीमध्ये २५, औरंगाबादमध्ये २०, कोल्हापुरात १९, पनवेलमध्ये १८, साताऱ्यात १५, नवी मुंबईत १३, उस्मानाबाद, अकोला आणि कल्याण डोंबिवलीत प्रत्येकी ११, सोलापुरात १०, वसई विरारमध्ये ७, बुलडाण्यात ६, भिवंडी निजामपूरमध्ये ५, अहमदनगर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी ४, नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, परभणी आणि लातूरमध्ये प्रत्येकी ३, गडचिरोली, नंदुरबार, रायगड आणि जळगावात प्रत्येकी २, वर्धा, भंडारा आणि बीडमध्ये प्रत्येकी १ आणि इतर राज्यात १ रुग्णाची नोंद झाली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आतापर्यंत ५ हजार ६७४ लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. राज्यातील आजची स्थिती आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासात ४८ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर, आज राज्यात एकूण ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात ४२ हजार ३९१ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या बरोबरत राज्यात आज एकूण २ लाख ६४ हजार ३८८ रुग्णांवर (सक्रिय रुग्ण) उपचार सुरू आहेत. क्लिक करा आणि वाचा- राज्यात आजपर्यंत एकूण ७० लाख ०९ हजार ८२३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी २९ लाख ५१ हजार २८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७४ लाख २० हजार ०२७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण १०.१७ टक्के इतके आहे. सध्या राज्यात २३ लाख ८७ हजार ५९३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार ३५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3GRh1FU

No comments:

Post a Comment