Breaking

Friday, January 28, 2022

कल्याण-डोंबिवलीत खळबळ! ५ माजी आयुक्तांसह १८ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल https://ift.tt/3g2zkfA

कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पाच माजी महापालिका आयुक्तांसह तब्बल १८ अधिकाऱ्यांवर कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली शहरात आणि पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. (crimes have been registered against 18 officers including 5 former commissioners in kalyan dombivali) अधिकाऱ्यांनी केले नियमांचे उल्लंघन माजी अपक्ष नगरसेवक अरुण गीध यांच्या तक्रारीनंतर प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाच्या निर्देशानुसार कल्याण विभागातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदाराच्या वकिलांनी केलेल्या तक्रारी व युक्तिवादाच्या आधारे वकील अक्षय कपाडिया दिवाणी न्यायाधीश आणि जेएमएफसी सोनाली शशिकांत राऊल यांनी १८ जानेवारी २०२२ रोजी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. क्लिक करा आणि वाचा- तक्रारदाराने न्यायालयात दिलेल्या दाव्यात म्हटले आहे की, कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालीन ५ आयुक्तांसह नगर नियोजक आणि इतर अधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिम भागातील अहिल्याबाई चौक येथील माणिक कॉलनी २००४ मध्ये तोडून या ठिकाणी टोलेजंग इमारत उभारण्याची परवानगी विकासकाशी संगनमत करून दिली. मात्र, परवानगी देताना या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. विशेष म्हणजे एफएसआय देण्याबाबत विकासकाची अवाजवी बाजू घेण्यात आल्याने त्यामध्ये अनियमितता केल्या होत्या. हे बांधकाम नियमांचे पूर्णपणे उल्लंघन करून उभारण्यात आले होते. तसेच पालिका अधिकारी आणि विकासक यांच्यातील बैठकाही इतिवृत्त म्हणून बनावट असल्याचे समोर आले होते. क्लिक करा आणि वाचा- माजी अपक्ष नगरसेवक गीध यांनी स्थानिक पोलीस आणि विभागीय आयुक्तांसह वरिष्ठांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यांनी कोणतीही दखल न घेतल्याने अखेर न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. ज्या कथित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात गोविंद राठोड, रामनाथ सोनवणे, एस. एस भिसे, ई. रवींद्रन, गोविंद बोडके या पाच तत्कालीन आयुक्तांचा गुन्हा दाखल झालेल्यामध्ये समावेश आहे. तसेच इमारत विकासकाचाही सहभाग असून काही माजी महापालिका आयुक्तांची इतरत्र बदली झाली आहे. तर काही सेवानिवृत्त झाले आहेत.सध्या भूखंडावर २३ मजली इमारत उभी -बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपीं विरुद्ध भादंवि. कलम ४२०, ४१८, ४१५, ४६०, ४४८,१२० ब , ३४ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९ आणि १३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला आहे. तर माजी नगरसेवक गिध यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HqvfOt

No comments:

Post a Comment