Breaking

Thursday, January 20, 2022

नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग; गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांचे वक्तव्य https://ift.tt/3H30X49

ठाणे: नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला काळा डाग आहे. हा डाग उभ्या आयुष्यात पुसताचं येणार नाही. तो डाग गडद होताच कामा नये, अशी भूमिका मांडत राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. यांनी विरोध दर्शवला आहे. अभिनेते अमोल कोल्हे यांचा ’व्हाय आय किल्ड गांधी’ या नाटकाच ट्रेलर प्रक्षेपित केल्यानंतर सध्या हे नाटक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चित्र दिसू लागली आहेत. अमोल कोल्हे यांचा चित्रपट ट्रेलर प्रक्षेपित झाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून विरोध दर्शवला आहे. (nathuram is a black spot on maharashtra says housing minister dr ) यावेळी ट्विटरच्या माध्यमातून आव्हाड यांनी “डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही” अशी भूमिका मांडली आहे. वाचा- गेल्या २० ते २५ वर्षांपासून शरद पोंक्षे आणि विनय आपटे यांच्या गांधीजींच्या विरोधात असलेल्या चित्रपटाचा किंवा नाटकाचा विरोध केला आहे आणि तो जितेंद्र आव्हाड म्हणून नाही तर एक वैचारिक दृष्टीकोन म्हणून हा विरोध केलाय. अमोल कोल्हे याचं व्हाय आय किल्ड गांधी या नाटकाच ट्रेलर प्रक्षेपित झाल आहे. जेव्हा एखादा कलाकार एक भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेत उतरतो. ती भूमिका करण्यासाठी तुमच्या मनात, हृदयात, बोलण्यात, भाषेत, वागण्यात उतरवावा लागतो त्याशिवाय कलाकार जन्माला येऊ शकत नाही. त्यामुळे अमोल कोल्हे यांनी भूमिका स्वीकारली तीच मुळात चुकीच असल्याच मत आव्हाड यांनी व्यक्त केल आहे. केवळ कलाकार आहे, म्हणून भूमिका स्विकारण याला काही अर्थ नसल्याचे हि ते म्हणाले. गांधीचा खून करणाऱ्या नथूरामाच उदात्तीकरण जो कोणी करेल तो वैचारिक दृश्य आमचा विरोधी असेल असे आव्हाड म्हणाले. हि भूमिका २०१७, २०१४, २००२ असो वा १९४७ असो.. भूमिका हि भूमिका असते. त्यामुळे २०१७ ला तुमच्या विचारात काय होता आणि २०२२ ला तुमच्या विचारात काय होता या दोन वेगळ्या गोष्टी असून एखादी भूमिका करत असताना त्या भूमिकेत आपण उतरत असतो हे प्रत्येक कलाकाराने लक्षात ठेवाव असे देखील यावेळी आव्हाड म्हणाले. वाचा- कलाकार आणि माणूस म्हणून दोन वेगळ्या भूमिका असूच शकत नाही. एखाद्या माहित नसलेल्या चित्रपटामध्ये माहीत नसलेला खलनायक म्हणजे उदा. गब्बर सिंग तो जगाला माहित नाही कारण ते निर्माण केलेल पात्र आहे. मात्र ज्यावेळी तुम्ही गांधी किंवा नथुराम साकारता त्यांच्याबद्दल सर्वांना माहिती आहे ना. मग या चारीत्र्यांना तुम्ही तुमच्या आत उतरवून नथुराम आणणार ना आणि गांधींवर गोळ्या झाडणार ना.. अस माझ मत असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. हे माझ वैयक्तिक मत असून यात पक्षाची कुठलीही भूमिका नसून पक्षाने मला कधीचं सांगितलं नाही की बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात बोला.. किंवा बोलू नका.. जेव्हा शरद पोंक्षे आणि विनय आपटे यांचे नाटक उधळून लावलं त्यावेळी पोंक्षे आणि आपटे हे दोघेही शरद पवार यांच्याकडे गेले होते. त्यावेळी यात पक्षाच काहीही भूमिका नसून हे आव्हाडांचे वैयक्तिक मत आहे आणि मी त्यांना माघार घेण्यासाठी सांगू शकत नाही असे शरद पवारांनी पोंक्षे आणि आपटे यांना सांगितले असल्याचे आव्हाड म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- या संपूर्ण प्रकरणात अमोल कोल्हे याचं आव्हाडांशी बोलणे झाले आहे. त्यावेळी कोल्हे यांनी हि नाटकासाठी २०१७ साली काम केल होते आणि अभिनय केला होता अस सांगितल्यानंतर आव्हाड यांनी देखील मला याचा विरोध करावा लागेल. कारण, मी शरद पोंक्षे आणि विनय आपटे यांना विरोध केला आहे. या संपूर्ण चित्रपट सृष्टीत ज्या ज्या कलाकाराने नथूरामाची बाजू घेतली त्या सगळ्यांना विरोध करत आलो त्यामुळे मी माजी बाजू बदलणार नसल्याचे कोल्हे यांना स्पष्ट केले असल्याचे यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35a6LKY

No comments:

Post a Comment