Breaking

Friday, January 7, 2022

'मला जाळू नका​​, जमिनीत गाडून टाका', मृत्यूपूर्वी सिंधुताईंची कविता, वाचून दगडालाही पाझर फुटेल! https://ift.tt/3JOH9TM

जयंत सोनोने, अमरावती : अनेक अनाथांना मायेची ऊब देणारी यांचं नुकतच निधन झाल्याने महाराष्ट्र पोरका झाला आहे. सिंधुताईंचा आणि अमरावती जिल्ह्याचा ऋणानुबंध हा जुनाच आहे. मेळघाटातील चिखलदरा येथे त्यांचं नेहमी जाणं येणं असायचं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवावर महानुभाव पंथाच्या रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या दफनविधीची कल्पना करत लिहिलेली कविता सध्या प्रचंड व्हायरल होत असून ही कविता दगडाला सुद्धा पाझर फोडणारी आहे. मला जाळू नका, जमिनीत गाडून टाका...! खरंच... मी जेव्हा जमीनदोस्त होईल सोबत काय येईल, मागे काय राहील? दुर्दैवाने खडक फोडले, दुःख जहाल मूर्तिमंत उभं आयुष्य गेलं ना खेद ना खंत ह्यातूनच नवी पहाट उद्याचं स्वप्न पाहिलं... अनेकांना जवळ केलं, देताल तेवढे दिलं आता थकले रस्ते, मनही खुणावते धीरे आस्ते संपेल आयुष्याच तेल, पणती विजून जाईल... सातपुडा उरी फुटेल चिखलदऱ्याचा धीर सुटेल वासराच्या गाई हंबरतील पशुपक्षी 'भैरवी' गातील स्तब्ध होतील वादळवारे कडेकपारी आणि झरे दुरावलेल्या भाग्याचं मी 'अहेव' लेण येईल मातीचा पदर पांघरून मला 'धरती' पोटात घेईल...! मृत्यूपूर्वी सिंधुताई सपकाळ यांनी लिहिलेली ही कविता जणू त्यांनी आपल्या मृत्यूपूर्वी मृत्यूची केलेली कल्पनाच. त्यांची ही मार्मिक कविता सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3HJOwKl

No comments:

Post a Comment