Breaking

Thursday, January 6, 2022

आता मास्क न घालणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या थेट पगारातून कापणार दंड https://ift.tt/3n2V8M0

औरंगाबाद : ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर करोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे नागरिकांना मास्क महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती केली जात असून, काही कठोर निर्णय सुद्धा घेतले जात आहे. दरम्यान, असाच काही निर्णय औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तहसील कार्यालयात तहसीलदार रमेश जसवंत यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत घेतला आहे. सोयगाव तहसील कार्यालयात गुरुवारी टास्क फार्सची बैठक झाली. यावेळी अनेक अधिकारी-कर्मचारीच मास्क घालत नसल्याचे लक्षात आल्याने, आता आजपासुन ( शुक्रवार ) सोयगावातील शासकीय अधिकारी व कर्मचारी विनामास्क दिसले तर त्यांना ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा दंड पगारातून कपात केला जाणार असल्याचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तर कर्मचाऱ्यांकडून दंड वसुलीचे अधिकार नोडल अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भीती औरंगाबाद शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील शाळा अजूनही सुरूच आहे. तर अनेक शिक्षक शहरातून अप-डाऊन करून शाळेत पोहोचतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही करोनाचा धोका असल्याचं पालकांचं मत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुध्दा भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3F1f6Nm

No comments:

Post a Comment