: यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामान्यावर घेणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खडकी येथून अटक केली. तसंच त्याच्या ताब्यातून पावणे तीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune ) पुनीत चंदनमल जैन (वय ३६, रा. मेहता टॉवर्स, खडकी) असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमासह भारतीय टेलीग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथील एकदिवसीय क्रिकेट सामान्यावर खडकीतील पुनीत जैन हा मोबाइलद्वारे लोटस, क्रिकेट बझ या क्रिकेट बेटिंग मोबाईल अॅपद्वारे ऑनलाईन बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खडकी येथे छापा टाकून जैन हा क्रिकेट स्टेडियममधील बुकीकडून बेकायदेशीररित्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन बेटिंग घेत असताना आढळला. दरम्यान, आरोपीकडून दोन लाख ६८ हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3fW8BBj
No comments:
Post a Comment