नवी दिल्ली: अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री यांचे मंगळवारी रात्री पुणे येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने सारेच हळहळले असून यांनी सिंधुताईंच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरच्या माध्यमातून सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली. ( ) वाचा: ' यांचे समाजसेवेतील योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या. त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांचे आयुष्य घडवले. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव असे काम केले. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीश: अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधानांनी ट्वीटरवर शेअर केला आहे. वाचा: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला. समाजाप्रती असलेले त्यांचे हे योगदान खूप मोठे आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती', असे ट्वीट गडकरी यांनी केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. वाचा: दरम्यान, सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांच्यावर महिन्याभरापासून उपचार सुरू होते. सिंधुताईंच्या मागे कन्या ममता तसेच असंख्य मुले असा परिवार आहे. सिंधुताईंच्या पार्थिवावर आज, बुधवारी दुपारी बारा वाजता ठोसरपागा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सिंधुताईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. वाचा:
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3mYUBdM
No comments:
Post a Comment