Breaking

Monday, January 24, 2022

आयपीएलमधल्या नवीन संघाचं अखेर बारसं झालं, तुम्हाला नाव समजलं की नाही... https://ift.tt/3qWeQex

मुंबई : आयपीएलमधील दोनपैकी एका संघाने आज आपल्या टीमचं बारसं केलं आहे. आयपीएलमध्ये आपल्या संघाचं नाव असेल तरी काय, हे लखनौच्या संघाने आज स्पष्ट केले आहे. संजीव गोएंका यांच्या ग्रुपने मोठी किंमत मोजत आयपीएलमधील फ्रँचायजी विकत घेतली. या संघाचे कर्णधारपद लोकेश राहुल भुषवणार असल्याचे म्हटले जात आहे. गोएंका ग्रुपने आता आपल्या संघाचे नाव ठेवले आहे. आयपीएमध्ये त्यांचा संघ 'लखनौ सुपर जायंट्स' या नावाने ओळखला जाणार आहे. त्यामुळे आता अहमदाबादच्या संघाने नाव काय ठेवण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. लखनौचा कर्णधार लोकेश राहुल हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरणार असल्याचे समोर आले आहे. राहुल याला लखनऊ फ्रँचायझीने आपला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. एवढेच नाही, तर यासाठी लखनऊ फ्रँचायझीने १७ कोटी रुपये मोजले आहेत. यासह राहुल आयपीएल २०२२ चा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. उजव्या हाताचा सलामीवीर खेळाडू संयुक्तपणे या लीगचा सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. यापूर्वी २०१८ ते २०२१ या वर्षासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने विराट कोहलीसोबत १७ कोटी रुपयांचा करार केला होता. राहुल व्यतिरिक्त लखनऊ फ्रँचायझीने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस (९.२ कोटी) आणि अनकॅप्ड युवा प्रतिभावान फिरकीपटू रवी बिश्नोई (४ कोटी) यांचाही समावेश केला आहे. या तीन खेळाडूंना खरेदी करूनही लखनऊ फ्रँचायझीकडे अजून लिलावासाठी सुमारे ५९ कोटी रुपये शिल्लक आहेत. संघाने आधीच अँडी फ्लॉवरची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, तर भारताचा माजी सलामीवीर आणि कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) दोनदा आयपीएलचे जेतेपद मिळवून देणाऱ्या गौतम गंभीरवर मार्गदर्शकाची भूमिका सोपविली आहे. त्यामुळे आता लिलावामध्ये हा संघ नेमकं काय करणार, याची उत्सुकता आता वाढलेली आहे. कारण लिलावापूर्वीच लखनौच्या संघाने मोठी पावलं उचलली आहेत. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या मेगा लिलावात लखनौचा संघ कोणत्या खेळाडूंना संघात स्थान देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3nWh9wt

No comments:

Post a Comment