Breaking

Monday, January 17, 2022

दिल्लीत दहशतवाद्यांनी प्लांट केला होता बॉम्ब!; 'या' पत्रामुळे उडाली खळबळ https://ift.tt/3qxlJ5Y

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या आधी राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवादी संघटनेचा कट होता आणि त्या कटाचा भाग म्हणून येथे बॉम्ब प्लांट करण्यात आला होता, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. टेलीग्रामच्या माध्यमातून पत्र पाठवून या दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली असून मोठ्या हल्ल्याची धमकीही दिली आहे. अल कायदाशी कनेक्शन असलेली ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येत आहे. ( ) वाचा: दिल्लीतील फूल मार्केटच्या गेटजवळ १४ जानेवारी रोजी एका बॅगमध्ये आयईडी बॉम्ब प्लांट करण्यात आल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. ही बॅग निर्जनस्थळी नेऊन बॉम्बचा नियंत्रित स्फोट घडवून आणण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणी कसून चौकशी करण्यात येत असतानाच मुजाहिदीन गजवात उल हिंदने याची जबाबदारी स्वीकारल्याने ही घटना अधिक गंभीर बनली आहे. या दहशतवादी संघटनेने जे पत्र पाठवले आहे त्यातील मजकूर सुरक्षा यंत्रणेसाठी मोठा अलर्ट देणारा ठरला आहे. वाचा: 'दिल्लीतील गाझीपूर मार्केटमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची योजना होती. त्यानुसार १४ जानेवारी रोजी तिथे आयईडी प्लांट करण्यात आला होता. काही टेक्निकल कारणांमुळे हा स्फोट झाला नाही. मात्र, पुढच्यावेळी असं होणार नाही. अधिक योजनाबद्धपणे आम्ही स्फोट घडवून आणू आणि या स्फोटाने संपूर्ण भारताला धडा मिळेल', अशी भ्याड धमकी या पत्रात देण्यात आली आहे. भारतातील राज्यांमध्ये आम्ही आधीच आमचा बेस तयार केला आहे. पूर्ण ताकदीने आम्ही आमची लढाई लढणार आहोत. आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही, असे नमूद करताना पोलिसांनाही या पत्राद्वारे धमकावण्यात आले आहे. काही मुजाहिदीनांना पकडलं म्हणजे आम्ही मोठं काम केलं असा जम्मू काश्मीरच्या पोलिसांचा समज बनला आहे पण याचा हिशेब चुकता केला जाणार आहे, असा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. व शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. त्याची पेरणीसुद्धा याच दहशतवादी संघटनेने केली होती, असे आता स्पष्ट झाले असून पंजाब पोलिसांनाही पत्रात धमकी दिली गेली आहे. या पत्राची सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3FBHtSk

No comments:

Post a Comment