: शेअर मार्केटच्या हवाल्याने बार्शीकरांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला विशाल फटे आज स्वतः हून सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर शरण आला आहे. याची अधिकृत माहिती सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांना दिली. () सोलापूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होण्यापूर्वी विशाल फटे याने आज सकाळी एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याने आपण आज सायंकाळी जवळच्या पोलीस ठाण्यात पोलिसांच्या स्वाधीन होणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार फटे हा अन्य पोलीस ठाण्यात न जाता थेट एसपी कार्यालयात येऊन हजर झाला आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करून उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. विशाल फटे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात आतापर्यंत ३५ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यात जवळपास १८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे म्हटलं आहे. 'देश सोडून पळून जाण्याचा विचार नव्हताच' मागील काही दिवसांपासून विशाल फटे हा गायब असल्याने तो विदेशात पळून गेल्याची चर्चा बार्शी परिसरात सुरू झाली होती. मात्र सोमवारी त्याने जारी केलेल्या व्हिडिओत संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं. 'लोकांची फसवणूक करण्याचा किंवा देश सोडून पळून जाण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. मात्र मी पैसे जमा करण्यासाठी काही दिवस बाहेर असल्याने लोकांनी अफवा पसरवल्या. मी जो व्यवसाय केला त्यात कुटुंबातील कुठल्याच सदस्याचा सहभाग नव्हता. फक्त कागदोपत्री ते संचालक होते,' असं त्याने म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3qz3Mns
No comments:
Post a Comment