Breaking

Thursday, January 27, 2022

माजी खासदार नीलेश राणे यांची नवाब मलिकांवर बोचरी टीका, म्हणाले... https://ift.tt/3r8taRa

गुहागर: कोकणात रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे मुंबई गोवा महामार्गावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल आंदोलन व राष्ट्रवादीचे नेते यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस (Nilesh Rane) जोरदार केली आहे. रत्नागिरी जिल्हयात गुहागर येथे भाजपच्या प्रमुख कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरासाठी गुरुवारी गुहागर येथे आले होते. यावेळी त्यांनी ही पत्रकारांजवळ संवाद साधला. (former mp criticizes minister ) या महामार्गाच्या नावावर तुम्हाला घरंच चालवायचं असेल तर महामार्ग अर्धवटच राहणार असे म्हणत माजी खासदार नीलेश राणे यांनी आजच्या महाविकास आघाडीने केलेल्या रास्ता रोको आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. क्लिक करा आणि वाचा- यांच आंदोलन म्हणजे आपणच चोरी करायची आणि आपणच तक्रार दयायची अशातला भाग आहे अशी टिका राणे यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रस्ता ९६ टक्के पूर्ण होऊ शकतो रायगड जिल्ह्यात ७५ टक्के पुर्ण होऊ शकतो मग रत्नागिरीत काय अडचण आहे? याला कारण रत्नागिरीत शिवसेनेची कर्मदरिद्री लोकं आहेत,यांच्याच ठेकेदारांमुळे महामार्ग रखडला. अशी घणाघाती टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी केली. आता त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला तरी शिवसेनेचे दिवस संपले आता अशीही टीका त्यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- नवाब मालिकांवर बोचरी टीका नवाब मलिक हा या माणूस आहे? त्याने तिकडे पाकिस्तान मध्ये जावं....तिकडे टिपू सुलतान नावाचा रस्ता आहे असे म्हणत भाजपचे नेते निलेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिक हे कौशल्य विकास मंत्री असून आपल्या मंत्री पदाचा फायदा व त्यांच्या कौशल्याचा उपयोग जावयाला बाहेर काढण्यासाठी केला, अशीही टीका त्यांनी केली. त्यांच्या मतदार संघात काय परिस्थिती आहे हे एकदा जाऊन पहा साधा ट्रकही जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. इकडे संजय राऊत व तिकडे नवाब मलीक यांना काहितरी असेच बोलण्याचे काम दिले आहे.विकासात्मक चर्चा काही नाही महाराष्ट्रातील विषय बाजुला ठेऊन काहितरी रोज नवीन टूम काढतात व बोलतात. महाराष्ट्रातील विकासात्मक मुख्य विषय बाजुला ठेवून नको त्या चर्चेतच महाराष्ट्र ठेवायचा आहे महाविकास आघाडी येणे हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशीही टीका राणे यांनी केली. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rPHQDW

No comments:

Post a Comment