Breaking

Thursday, January 27, 2022

भेकराच्या पिल्लाची तस्करी; त्रिकुटाला वनविभागाने केली अटक https://ift.tt/3sfnVij

ठाणे: येथे जिवंत भेकराच्या पिल्लाची करणाऱ्या तीन जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे त्रिकुट भेकराच्या पिलाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचत या त्रिकुटाला अटक केली आहे. ( has arrested three persons for ) ठाण्यातील भिवंडी तालुक्यात कासणे गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी काही जन एका जिवंत भेकराच्या पिल्लाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभाग खात्याला गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानंतर वनविभाग अंतर्गत मांडवी उपविभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा येथील वनक्षेत्रपाल एस. बी. देवरे यांच्या नेतृत्वखाली वनविभागाच्या पथकाने सापळा रचून भेकर जातीचे पिल्लाची तस्करी करून अवैध विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले. क्लिक करा आणि वाचा- या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर वन्यजीव अधिनियम १९७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने हे भेकाराचे पिल्लू कुठून आणले? कशासाठी आणल होते? ते कोणाला विक्री करणार होते? याचा तपास वनविभाग अधिकारी करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/33XfHTI

No comments:

Post a Comment