औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आता गंभीर होत चालली आहे. गुरुवारी चक्क ५७३ रुग्णांची भर पडली असून, कोरोना आता प्रत्येक औरंगाबादकरांच्या घरापर्यंत पोहोचल्याची असल्याची परिस्थिती आहे. कारण शहरातील जवळपास सर्वच महत्वाच्या भागात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. तर गेल्या १३ दिवसात २ हजार ७५१ रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. औरंगाबाद माहिती कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण ५७३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ज्यात मनपा हद्दीत ३८२ रुग्णांचा समावेश असून, ग्रामीण भागातील १९१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर एकूण ९४ रुग्णांना सुट्टी देण्यात आली असून २ हजार ३१५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तिघांचा मृत्यू..... औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्य वाढत असताना, गेल्या ७ दिवसांपासून कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र गुरुवारी ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती, प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली आहे. नाथ मंदिर दोन दिवस बंद राहणार.… पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या नाथ मंदिरात दरवर्षी मकर संक्रातीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. जिल्हाच नव्हे तर इतर जिल्ह्यांतूनही भाविक दर्शनासाठी पैठणमध्ये येत असतात. त्यामुळे यावेळी सुद्धा अशीच गर्दी होण्याची शक्यता असल्याने, नाथ मंदिर १४ आणि १५ जानेवारी या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचं करण्याचा निर्णय नाथ संस्थाने घेतला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3K9gcu7
No comments:
Post a Comment