Breaking

Tuesday, January 25, 2022

मुंबई इंडियन्सचे दोन दिग्गज खेळाडू आयपीएलपूर्वीच एकमेकांना भिडणार, पाहा कुठे आणि कसे... https://ift.tt/3tZM1A6

नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यापूर्वी आता बराच कालावधी असला तरी मुंबई इंडियन्सचे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांना भिडणार असल्याचे आता समोर आले आहे. आयपीएलचा लिलाव जेव्हा होणार आहे तेव्हाच रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सच्या एका महत्वाच्या खेळाडूमध्ये युद्ध रंगणार आहे. नेमकं होणार तरी काय, पाहा...आयपीएलचा लिलाव सुरु होण्यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि कायरन पोलार्ड हे एकमेकांसमोर उभे ठाकले जाणार आहेत. कारण रोहित एकिकडे भारताचे नेतृत्व करत असेल तर दुसरीकडे पोलार्डकडे वेस्ट इंडिजच्या संघाने नेतृत्व असणार आहे. रोहित आणि पोलार्ड हे दोघेही मुंबई इंडियन्सचे दिग्गज खेळाडू आहेत. रोहितने आतापर्यंत सर्वाधिकवेळा मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे, पण जेव्हा रोहित खेळू शकत नाही तेव्हा मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हे पोलार्डकडे देण्यात येत असल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी फार महत्वाचे आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाने यावर्षी तर रोहित शर्माला आयपीएलच्या लिलावात सहभागी करण्याचे ठरवले आहेत. आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा कोणताही कर्णधार लिलावात सहभागी झाला नव्हता. पण या लिलावात रोहितला हा मान मुंबई इंडियन्सचा संघ देणार आहे. त्यामुळे रोहितसाठी आता ही एक नवीन जबाबदारी असणार आहे. त्यामुळे रोहित मुंबई इंडियन्सच्या संघाची बांधणी यावेळी कशी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिन्ही वनडे सामने हे अहमदाबाद येथे ६, ९ आणि ११ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. त्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिन्ही ट्वेन्टी-२० सामने कोलकातामध्ये रंगणार आहे. हे ट्वेन्टी-२० सामने १६ , १८ आणि २० या कालावधीत रंगणार आहेत. दक्षिण आफ्रिकेत रोहितच्या गैरहजेरीत भारताला कसोटी आणि वनडे मालिका गमवावी लागली होती. पण आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजय मिळवणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rPindX

No comments:

Post a Comment