Breaking

Saturday, January 29, 2022

बिअरसाठी पैसे दिले नाही; दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात खुपसली बिअरची बॉटल https://ift.tt/jHabkyDqr

चंद्रपूर : पिण्यासाठी तीन मित्र बसले. बिअर ढोसलीही. दोघांनी बिअरसाठी पैसे मागितले. मात्र तिसऱ्या मित्राने नकार दिला. नकार ऐकताच रागाच्या भरात दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बाटली खुपसल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यातील बल्हारपूर येथे घडली. शाहरूख पठाण असे जखमीचे नाव आहे. निरज यादव, अंकित रामटेके या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकात ही घटना घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही मित्र आज सहा वाजताचा दरम्यान बिअर पीत बसले होते. तिघांनीही बिअर ढोसली. मात्र निरज यादव आणि अंकित रामटेके यांनी परत बिअर पिण्यासाठी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र शाहरूखने नकार दिला. नकार ऐकताच दोघांचा पारा भडकला. रागाच्या भरात बिअरची बॉटल शाहरूखचा पोटात खुपसली. यात शाहरूख गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत शाहरुखला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार बल्हारपूर पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली आहे. पुढील तपास बल्हारपूर पोलीस करीत आहेत.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/6aPfgq2Tk

No comments:

Post a Comment