Breaking

Thursday, January 13, 2022

UP Elections: उत्तर प्रदेशात 'बिकिनी गर्ल'ला काँग्रेसचं तिकीट; चर्चा तर होणारच! https://ift.tt/3K8SSMW

नवी दिल्ली: निवडणुकीची जोरदार रणधुमाळी रंगली आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चितीसाठी मॅरेथॉन बैठका सुरू असताना काँग्रेसने आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. यात मेरठमधील हस्तिनापूर येथून बिकीनी गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री हिला काँग्रेसने उमेदवारी दिली असून त्याचीच सध्या जोरदार चर्चा होत आहे. ( ) वाचा : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची धुरा यांच्याकडे असून त्यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे प्रियांका या आधीपासूनच मोर्चेबांधणी करत असून गुरुवारी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर करून त्यांनी पहिले मोठे पाऊल टाकले आहे. यात ५० महिला उमेदवार देण्यात आले असून यादीतील अर्चना गौतम या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रियांका यांनी अर्चनावर विश्वास टाकत तिला मेरठमधील हस्तिनापूर येथून पक्षाचं तिकीट दिलं आहे. २६ वर्षीय अर्चना ही मॉडेल आणि अभिनेत्री असून हे राजकारणातील तिचे पहिले पाऊल ठरले आहे. नोव्हेंबर महिन्यात अर्चना गौतमने पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या विविध उपक्रमांत तिचा सहभाग राहिला होता. प्रियांका गांधी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'लड़की हूँ लड़ सकती हूँ' या मोहिमेत तिने हिरीरीने भाग घेतला. तिला हस्तिनापूरमधून काँग्रेसचं तिकीट मिळणार अशी चर्चा होती आणि पहिल्याच यादीत तिने बाजी मारली. त्यामुळे हस्तिनापूर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसला तगडं आव्हान मिळेल, असे बोलले जात आहे. वाचा : अर्चना गौतम कोण आहे? मॉडेल, अभिनेत्री अर्चना गौतम म्हणून ओळखली जाते. अर्चनाने मिस बिकिनी इंडिया २०१८ किताब जिंकला होता. सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे ७.२८ लाख फॉलोवर्स आहेत. इन्स्टावरील तिचे व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. तिचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. तिच्या डान्स व्हिडिओजनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. अर्चनाने अनेक जाहिराती केल्या असून २०१५मध्ये तिने बॉलीवूडमध्ये एंट्री केली. ग्रेट ग्रँड मस्ती हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर हसीना पारकर, बारात कंपनी, जंक्शन वाराणसी या चित्रपटांतही तिने भूमिका साकारल्या. याशिवाय तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतही तिने काम केले आहे. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3A3BvIT

No comments:

Post a Comment