चंदीगड: यांनी गुरुवारी कोविड स्थितीबाबत सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला पंजाबचे मुख्यमंत्री हेदेखील उपस्थित होते. यावेळी बोलताना चन्नी यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यात घडलेल्या प्रकाराबाबत पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. ( ) वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जानेवारी रोजी पंजाब दौऱ्यावर होते. येथे त्यांच्याहस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन होणार होते. त्याआधी ते येथे राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देणार होते. हवामान खराब असल्याने पंतप्रधान भटिंडा येथून पुढे हवाईमार्गे न जाता रस्तेमार्गे निघाले. दरम्यान, हुसैनीवाला मार्गावर मध्येच निदर्शकांनी पंतप्रधान मोदी यांचा ताफा रोखला. जवळपास १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा एकाच जागी उभा होता. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेत पंतप्रधानांनी पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले व ते माघारी परतले. त्यानंतर भटिंडा विमानतळावर अधिकाऱ्यांशी बोलताना पंतप्रधानांनी गंभीर विधान केले होते. 'मी जिवंत परतू शकलो. तुमच्या मुख्यमंत्र्यांना माझे धन्यवाद सांगा', असे पंतप्रधान म्हणाले होते. त्यावरून मोठे वादळ उठले होते. मुख्यमंत्री चन्नी यांनी यावर भाष्य करताना पंतप्रधानांच्या सुरक्षेला कोणताही धोका नव्हता असे स्पष्ट केले होते व सुरक्षेत कोणतीही चूक झाली नसल्याचा दावाही केला होता. दरम्यान, याप्रकरणी चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, एनआयएचे महासंचालक, चंदीगडचे पोलीस महासंचालक, पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची समिती नेमली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुरुवारी प्रथमच कोविड आढावा बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री चन्नी एकमेकांसमोर आले. वाचा : पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला व त्यांच्याकडून राज्यातील स्थिती जाणून घेतली. यावेळी राज्यातील कोविड स्थिती सांगत असतानाच चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवर पुन्हा एकदा खेद व्यक्त केला. 'पंतप्रधानांचा आम्ही सन्मान करतो. तुम्ही पंजाबमध्ये आला असता तुमच्या दौऱ्यात जो प्रकार घडला त्याचा आम्हाला खेद आहे', असे सांगत चन्नी यांनी पंतप्रधानांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांसाठी चन्नी एक शेरही बोलले. 'तुम सलामत रहो कयामत तक और खुदा करे की कयामत न हो', अशा शब्दांत चन्नी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. चन्नी यांनी कोविड आढावा बैठकीच्या निमित्ताने पंतप्रधानांशी संवाद साधून एकप्रकारे केंद्र व राज्यात निर्माण झालेला तणाव कमी करण्याचाच प्रयत्न केला. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3tuGukz
No comments:
Post a Comment