Breaking

Sunday, February 13, 2022

चांगली बातमी! मुंबईत करोनाचा आलेख आला खाली; पाहा, ताजी स्थिती! https://ift.tt/04BPqWv

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन (Coronavirus) रुग्णसंख्येत घट होत असल्याने मुंबईकरांना मोठाच दिलासा मिळत आहे. आजही मुंबईत कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्येत काहीशी घट झालेली दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी मुंबईत एकूण २८८ नव्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईत आज ०१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच मुंबईत आज ५३२ करोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. आज निदान झालेल्या एकूण २८८ रुग्णांपैकी ३५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरीत २५३ रुग्णांमध्ये लक्षणे नसल्याकारणाने त्यांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. (mumbai registered 288 new cases in a day with 432 patients recovered and 01 death today) क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील एकूण बाधितांपैकी आतापर्यंत एकूण १० लाख ३१ हजार ८३६ रुग्ण बरे झाले आहेत. या बरोबरच मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर आहे ९८ टक्के. तर मुंबईत आज एकूण २ हजार ६७७ रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा दर हा १ हजार ३९७ दिवसांचा आहे. तर मुंबईत ०६ फेब्रुवारी १२ फेब्रुवारी या कालावधीत रुग्णवाढ ०.०५ टक्के इतकी आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. सध्या मुंबईत एकही इमारत सील करण्यात आलेली नाही. तर, आज नव्याने सापडलेल्या २८८ रुग्णांपैकी ३५ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पालिकेकडील ३६ हजार ८८९ बेड्सपैकी केवळ १ हजार ०२७ बेडचा वापर करण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुंबईतील संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती > २४ तासात बाधित रुग्ण- २८८ > २४ तासात बरे झालेले रुग्ण- ५३२ > बरे झालेले एकूण रुग्ण- १०३१८३६ > बरे झालेल्या रुग्णांचा दर-९८% > एकूण सक्रिय रुग्ण- २६७७ > दुप्पटीचा दर- १३९७ दिवस > कोविड वाढीचा दर (०६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी)- ०.०५% क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mz6hpEW

No comments:

Post a Comment