बुलडाणा : स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्याकडून शेगाव शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात आली. या चोरट्यांकडून १७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आणखीही ४ ते ५ दुचाकींचा शोध सुरु आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, शेगाव शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी चोरट्यांची टोळी शेगाव येथीलच आहे. या खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने ११ फेब्रुवारी सकाळपासून सापळा रचून शेगावतून पाच आणि शहर परिसरातून एकूण सतरा दुचाकी वाहने जप्त केली. यातील म्होरक्या आणि इतर चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आणखी कुठे कुठे दुचाकी चोरीच्या घटना घडविण्यात आल्या? याबाबत पोलिस विचारपूस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध ठिकाणावरून चोरीच्या १७ विना नंबरच्या दुचाकी वाहन जप्त करुन शेगाव पोलीस स्टेशन आवारात जमा केल्या. अजूनही चोरी झालेल्या काही दुचाकी वाहने पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dIbmyMZ
No comments:
Post a Comment