IPL 2022, नवी दिल्ली : अंबांनीनी आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. पण या लिलावात अंबांनीनी एक मोठी चूक केल्याचे आता समोर आले आहे. ही चूक मुंबई इंडियन्सच्या संघाला चांगलीच महागाड पडू शकते. अंबानी यांच्या चुकीमुळे आता रोहित शर्माची डोकेदुखी चांगलीच वाढलेली पाहायला मिळत आहे. अंबानींकडून झालेली चूक मुंबई इंडियन्सला कशी पडणार महागात, पाहा...अंबांनींनी आयपीएलच्या झालेल्या लिलावात काही खेळाडूंवर पैशांची खैरात केली. आयपीएलमधील सर्वाधिक मानधन देणारा संघ मुंबई इंडियन्स ठरला. इशान किशनसाठी तब्बल १५ कोटी रुपये मोजणाऱ्या अंबानींकडून लिलावात एक मोठी चूक झाल्याचे आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सने इशानला संघात घेतले खरे, पण जर इशान काही कारणास्तव खेळू शकला नाही तर त्याच्यासाठी चांगला पर्याय त्यांनी शोधलेला पाहायला मिळालेला नाही. इशान जर दुखापतग्रस्त झाला किंवा काही कारणास्तव खेळू शकला नाही तर त्याच्या बदली अनुभवी यष्टीरक्षक मुंबई इंडियन्सकडे नसल्याचे आता समोर आले आहे. क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक किती महत्वाचा असतो, हे चाहत्यांना सांगायला लागू नये. जिथे काही संघांनी चार-चार यष्टीरक्षक संघात दाखल करून घेतले तिथे मुंबई इंडियन्सने इशानसाठी चांगला पर्याय शोधला नसल्याचेच पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सने क्विंटन डीकॉकला लिलावात आपल्या संघात दाखल करून घेतले नाही. यापूर्वी डीकॉक हा मुंबई इंडियन्ससाठी यष्टीरक्षण आणि सलामीवीर अशा दोन्ही भूमिका बजावत होता. त्यावेळी इशानकडे फक्त फलंदाजीची जबाबदारी होती. पण आता त्याला या दुहेरी भूमिका बजावायला लागणार आहेत. त्यामुळे जर इशानवर अतिताण आला आणि त्याला दुखापत झाली तर मुंबई इंडियन्सचा संघ अडचणीत येऊ शकतो. मुंबई इंडियन्सच्या संघाने लिलावाच्या अखेरच्या टप्प्यात आर्यन जुनाल या युवा यष्टीरक्षकाला २० लाख रुपये मोजत आपल्या संघात दाखल केले आहे. पण आर्यनकडे क्रिकेटचा जास्त अनुभव नाही आणि मोठ्या स्तरावर तो क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये इशानला जर काही झाले किंवा तो खेळू शकणार नसेल, तर मुंबई इंडियन्ससाठी ही मोठी अडचण ठरणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/pf7WeGC
No comments:
Post a Comment