हिंगोली : हिंगोलीतील एका सात वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आज हिंगोली जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. खेळण्यासाठी गेलेल्या मुलीला १० रुपयांचं आमिष दाखवून नराधमाने तिच्यावर अत्याचार केला होता. दि. २५/११/२०१८ रोजी पो.स्टे. हिंगोली शहर येथे पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली होती की, दि. २५/११/२०१८ रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीची मुलगी (वय ७ वर्ष) खेळण्यासाठी घराबाहेर मैदानावर गेली असता, आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीस १० रुपयाचे अमिष दाखवून तिला हाताला धरून स्वतःच्या घराच्या छताच्या पायल्यावर नेऊन तिच्यावर बळजबरीने अनैसर्गिक संभोग केला. घटनेची माहिती कोणाला सांगितली तर तुला जिवे मारीन, अशी धमकी आरोपीने पीडितेस दिली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पो.स्टे हिंगोली शहर येथे भादंवि ५८७/२०१८ कलम ३७६ ( २ ) (आय), ३७७,५०६ हिंगोली येथे दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने याप्रकरणी एकूण १४ साथीदार तपासले. यात फिर्यादी आणि पीडिता तसेच इतर साक्षीदाराचा पुरावा ग्राहय गुन्हेगारास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसंच १०,००० / - दंड आणि दंड न भरल्यास १ वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ ( २ ) दोषी ठरवून ०५ भा.दं.वि. नुसार पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल वर्षे सक्षम कारावास व रु . ५,००० / - आणि दंड न अधिनियम २०१२ अन्वये दोषी ठरवून 7 वर्षे कारावास १००००/- आणि न भरल्यास १ वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DSj6T02
No comments:
Post a Comment