मुंबई : आयपीएलच्या मेगा लिवावापूर्वी मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि तो जगभरात चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सने एक बडबड्या विकेटकिपर शोधला आहे. या व्हिडीओमध्ये हा विकेटकिपर जे काही बोलत आहे ते ऐकाल तर तुम्ही रिषभ पंतलाही विसरून जाल आणि म्हणाल हा तर रिषभ पंतचा पण बाप निघाला. आतापर्यंत भारताला असे काही यष्टीरक्षक लाभले आहेत की, जे ते आपल्या बडबडीमुळे ओळखले जातात. याबाबत किरण मोरे आणि पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांचा किस्सा सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर भारताला नयन मोगिंयाच्या रुपात असा बडबड्या विकेटकिपर लाभला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी हा स्टम्पमागून आपल्या गोलंदांना आणि क्षेत्ररक्षकांना बऱ्याचदा सुचना करायचा. पण तो बडबड करायला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यष्टीरक्षण करताना तो कधीही प्रतिस्पर्धी खेळाडूबद्दल काहीच बोलला नाही. पण आता सध्याचा विकेटकिपर रिषभ पंत हा चांगलाच बडबड्या आहे. पण मुंबई इंडियन्सने पंतपेक्षाही भन्नाट बडबड्या विकेटकिपर शोधला आहे. हा विकेटकिपर फलंदाजाला चांगलाचच छळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना मुंबई इंडियन्सने एक मेसेजही लिहिला आहे. हा मेसेज म्हणजे आयपीएलच्या लिलावाची हिंट तर नाही ना, असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. आयपीएलच्या मेगा लिलावासाठी मुंबई इंडियन्सने जोरदार तयारी केली आहे. मुंबई इंडियन्सने लिलावापूर्वीच रोहित शर्मासह चार खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश आहे. रोहितसाठी मुंबई इंडियन्सने १६ कोटी रुपये मोजले आहेत, तर बुमरा त्यांनी १२ कोटी रुपये दिले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी तिसरा सर्वात महगडा खेळाडू ठरला आहे सूर्यकुमार यादव. कारण मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवसाठी आठ कोटी रुपये एवढी रक्कम मोजली आहे. मुंबई इंडियन्सने एवढी रक्कम उपकर्णधार कायरन पोलार्डलाही दिलेली नाही. मुंबई इंडियन्सने पोलार्डला संघात कायम ठेवण्यासाठी सहा कोटी रुपये मोजले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सने चार खेळाडूंसाठी आतापर्यंत ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सकडे ४८ कोटी एवढी रक्कम शिल्लक आहे. आता मुंबईसाठी आयपीएलच्या लिलावाचे बजेट हे ४८ कोटीएवढे असेल आणि त्या किंमतीमध्येच त्यांना आता आपला ंसघ बांधावा लागणार आहे. कारण यापेक्षा जास्त रक्कम मुंबईला लिलावात मिळणार नाही. आता या व्हिडीओनंतर मुंबई इंडियन्सचा विकेटकिपर कोण असेल, असा प्रश्न चाहत्यांना पडला नक्कीच पडला असेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/OtP38rT
No comments:
Post a Comment