Breaking

Saturday, February 12, 2022

नवा गडी, नवं राज्य; लिलावाच्या पहिल्याच दिवशी केकेआरला मिळाला नवीन कर्णधार https://ift.tt/A6cL43u

Ipl 2022, बंगळुरु : आयपीएल लिलावाच्या पहिल्याच दिवशी कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाला आपला कर्णधार मिळाला आहे. केकेआरचा संघ गेल्या काही वर्षांपासून चांगल्या कर्णधाराच्या शोधात होता. पण या लिलावाच्या पहिल्याच दिवशी त्यांना आता एक चांगला कर्णधार मिळाला आहे. केकेआरचा कर्णधार असेल तरी कोण, जाणून घ्या...केकेआरचे नेतृत्व काही वर्षांपूर्वी दिनेश कार्तिककडे होते. पण त्याच्यामध्ये आणि आंद्रे रसेलमध्ये मोठा वाद झाला. त्याचा परीणाम संघावर व्हायला लागला आणि त्यामुळे संघाची कामगिरी खालावली. त्यामुळे कार्तिककडून केकेआरने कर्णधारपद काढत इंग्लंडच्या इऑन मॉॉर्गनकडे दिले होते. पण मॉर्गनच्या नेतृत्वाखाली केकेआरची कामगिरी अजूनच ढिसाळ झाली. त्यामुळे केकेआरचा संघ यावर्षी कर्णधाराच्या प्रतिक्षेत होता आणि लिलावाच्या पहिल्याच दिवशी त्यांना नेतृत्व करणारा भारतीय चेहरा मिळाला आहे. केकेआरचे नेतृत्व या हंगामात श्रेयस अय्यरकडे दिले जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. केकेआरच्या कर्णधारपदासाठी श्रेयस आणि पॅट कमिन्स या दोघांची नावं चर्चेत होती. कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने अॅशेस मालिकेत धडाकेबाज कामगिरी करत दणदणीत विजय मिळवले होते. त्यामुळे कमिन्सही या शर्यतीमध्ये होता. पण कमिन्स हा एक गोलंदाज आहे आणि गोलंदाजांना जास्त दुखापती होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर श्रेयस हा भारतीय चेहरा आहे आणि आयपीएलमध्ये जर कर्णधार भारताचा असेल तर त्या संघाला जास्त भाव मिळतो, असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे श्रेयसने या दोन गोष्टींमुळे बाजी मारली आहे. यापूर्वी श्रेयसने दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले होते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. पण श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले होते. आयपीएलच्या या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवला होता. पण श्रेयसने दिल्लीच्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते. त्यामुळे आता श्रेयस केकेआरच्या संघाला जेतेपद मिळवून देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे श्रेयसकडे केकेआरचे कर्णधारपद अधिकृतपणे कधी देण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LvCcd9B

No comments:

Post a Comment