Breaking

Saturday, February 12, 2022

मोठी बातमी: अरबी समुद्रात २ हजार कोटींचे ड्रग्ज जप्त; पाक-मुंबई कनेक्शन? https://ift.tt/L1RNaFi

नवी दिल्ली: अरबी समुद्रात अर्थात एनसीबी आणि यांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई करत दिला आहे. या कारवाईत ७६३ किलो इतका ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन हजार कोटी रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या ड्रग्जचा पुरवठा मुंबईत केला जाणार होता असा संशय असून त्यादिशेने तपास करण्यात येत आहे. ( ) वाचा : एनसीबीने एक निवेदन जारी करत या कारवाईबाबत माहिती दिली आहे. ५२९ किलो , २३४ किलो क्रिस्टल मेथामफेटामाइन आणि काही प्रमाणात हेरॉइन असे जवळपास दोन हजार कोटी किंमतीचे ड्रग्ज बोटीतून जप्त करण्यात आले आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. ड्रग्जचा मोठा साठा होडीतून मुंबईला पाठवण्यात येणार असल्याची पक्की खबर एनसीबीला मिळाली होती. याबाबत एनसीबीने नौदलाला अवगत केले. त्यानंतर खोल समुद्रातच या बोटवर कारवाई करण्यासाठी सापळा रचण्यात आला. त्यानुसार गुजरातजवळ समुद्रात एनसीबी व नौदलाने संयुक्तपणे कारवाई केली. तब्बल चार दिवस ही कारवाई चालली. ही बोट आज किनारी आणली गेली असून त्यावरील ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. समुद्रात भारतीय हद्दीत ही कारवाई करण्यात आली. हे ड्रग्ज पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते, असा दाट संशय आहे. वाचा: चार दिवसानंतर मोहीम फत्ते गुजरातच्या समुद्रात भारतीय हद्दीत नौदलाची सतत गस्त सुरू असते. गस्तीवरील एका जहाजावर एनसीबीचं पथक दबा धरून होतं. चौथ्या दिवशी या मोहिमेला यश मिळालं. ड्रग्जसाठा घेऊन भारतीय हद्दीत बोटीने प्रवेश करताच कारवाई करण्यात आली. नौदलाच्या कमांडोंना पाहून बोटीतील खलाशांनी बोट तशीच सोडून दुसऱ्या बोटीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून भारतात समुद्रमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जतस्करी वाढली असून प्रथमच खोल समुद्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर ती लगेच नौदलाच्या संबंधित विभागाला देण्यात आली आणि त्यानंतर संयुक्तपणे पुढील कारवाई केली गेली, असेही एनसीबीकडून सांगण्यात आले. वाचा:


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/w7UsoaD

No comments:

Post a Comment