रत्नागिरी: जिल्हयात दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान व राष्ट्रवादीचे माजी आमदार यांच्यात विकासकामांच्या भूमिपूजनावरून संघर्ष पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी थेट विधानपरिषद उपाध्यक्षांकडे संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावाची तक्रार दाखल केली आहे. (Shiv Sena MLA and former NCP MLA are likely to clash) माजी आमदार संजय कदम हे आता आमदार नसताना देखील विधानसभा मतदारसंघात भूमिपूजन करत फिरत आहेत त्यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र दिले आहे अशी माहिती दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी सोमवारी ७ जानेवारी रोजी दापोलीत पत्रकार परिषदेत दिली. नियम ७३ अन्वये हे पत्र विधानसभा उपाध्यक्ष महोदयांनी स्वीकारून पुढील कायदेशीर कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे दिले आहे अशी माहिती योगेश कदम यांनी व्यक्त केला. क्लिक करा आणि वाचा- आमदार कदम पुढे म्हणाले की, आपण आमदार नसताना जे करून दाखवले ते आमदार असताना संजय कदमना करता आले नाही अशी टीका आमदार योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्री सडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन केले अशी अनेक भूमि पूजने नावाच्या मागे केवळ मा.आ.पुढे स्वताचे नाव लिहुन जनतेची दिशाभूल संजय कदम करत आहेत त्यांना आता ते आमदार नाहीत याचे भान नसावे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे अशी बोचरी टीका आमदार योगेश कदम यांनी केली. मुखमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजूर झालेला दापोली तालुक्यातील करंजाळी पावनळ, कात्रण रस्ता खडीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाचा कार्यादेश मिळाल्यावर संजय वसंत कदम (माजी आमदार) यांनी २५ जानेवारी २०२२ रोजी भूमिपूजन केले. या पाटीवर मा.आ.संजयराव कदम, दापोली मंडणगड खेड विधानसभा मतदारसंघ व राष्ट्रवादीच्या पदाधीकाऱ्यांची नावे असा मजकूर लिहून माझा आमदार म्हणून हक्क डावलून जनतेची दिशाभूल करत आहेत असा गंभीर आरोप आमदार योगेश कदम यांनी केला आहे२०१४ ते १९ या कालावधीत मंजूर झालेल्या विकासकामांची भूमीपूजन करण्याचा अधिकार देखील मजी आमदाराला नसतो एकदा पडल्यावर ते अधिकार आमदार म्हणून पुढे आपल्याकडे येतात. याची जणीवही संजय कदम यांना नाही. क्लिक करा आणि वाचा- आता मी नाही जनताच म्हणते संजय कदम गावठी आमदार होता त्यांच्याकडून कोणत्याही नियमांची माहीती असण्याची अपेक्षा नाही अशी बोचरी टिका आमदार योगेश कदम यांनी केली.भूमिपूजन करायची पाटीवर पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांची नाव त्यामुळे जनाधार संपत चलल्याची जाणीव संजय कदम यांना झाल्याने जनतेची दिशाभूल करत आहेत अशीही टीका त्यांनी केली. दापोली तालुका पंचायत समिती सभापती योगिता बांद्रे यांच्यावरही त्या चुकीच्या पद्धतीने भूमिपूजन करत असल्याने आपण हक्कभंग पत्र देणार असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- या सगळ्या पार्श्वभूमीवर आता माजी आमदार संजय कदम येत्या काळात कोणती भूमिका या सगळ्या वादाविषयी घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/EvbK3sZ
No comments:
Post a Comment