चंद्रपूर : गुरांना हिरवा चारा आणायला 'तो' ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा बफर क्षेत्रात गेला. चारा कापत असतानाच वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात धांडे (वय 50) यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना सितारामपेठ गावाजवळ घडली. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना सितारामपेठ गावाजवळच्या शिवारात घडली. जनावरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेले असता वाघाने हल्ला केला. या हल्यात धांडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या भागात वाघाचे वास्तव्य असल्याचे वनविभागाने ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिले होते. तरीही या भागात चारा आणण्यासाठी ग्रामस्थ प्रवेश करतात. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठले. प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाघांचे हल्ले वाढले आहेत. मागील २०२१ या वर्षी हल्यात ठार झालेल्यांचा आकडा पन्नासचा वर गेला होता.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jPXhugkYy
No comments:
Post a Comment