मुंबई: गृहनिर्माण मंत्री यांनी एसआरएबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यापुढे निष्कासित झाल्यानंतर ती तीन वर्षांनंतर विकता येणार आहे. या निर्णयाचा लाखो गरिबांना फायदा होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. या बरोबरच सशुल्क घर विकत घेण्याचा दर अडीच लाख रुपये इतका ठेवण्यात आल्याची घोषणाही आव्हाड यांनी केली आहे. या निर्णयामुळे गरिबांना आता आपल्या हक्काचे घर घेण्यास मोठी मदत होईल, असेही आव्हाड म्हणाले. ( in mumbai three years after it developed the decision taken by housing ministry of maharashtra) क्लिक करा आणि वाचा- बंडातात्या कराडकरांवर आव्हाड यांची टीका हा निर्णय जाहीर करतानाच गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी सरकार वाईन धोरणावरही भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका कीर्तनकाराच्या तोंडात अशा प्रकारची भाषा अजिबात शोभत नाही, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. बंडातात्यांवर जसे संस्कार झालेले आहेत तसेच ते बोलले आहेत. ते वारकरी आहेत की नाही हे तपासून पाहण्याची गरज आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी बंडातात्या कराडांवर घणाघाती टीका केली आहे. क्लिक करा आणि वाचा- केंद्र सरकारवरही साधला निशाणा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी यावेळी केंद्र सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला. गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये देशात आर्थिक नाकेबंदी झाली असल्याचे ते म्हणाले. ही नाकेबंदी झालेली असली तरी आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे बिल्डरांसह सर्वसामान्य जनतेलाही फायदा झाल्याचे ते म्हणाले. बंद झालेल्या योजना पुन्हा सुरू करण्याचा विचार असल्याचेही ते पुढे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Bejfx3G10
No comments:
Post a Comment