ठाणे: ठाणे आणि दिव्यादरम्यानच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांनी उपस्थिती लावली होती. मात्र या दरम्यान या मंत्र्यांनी या मुंबईची ओळख असलेल्या वडापावचा आस्वाद घेतला. मात्र आणि भजीपाव खाल्ल्यानंतर मंत्री आणि कार्यकर्ते बिल न देताच निघून गेले. मात्र याचा व्हिडीओ आणि बातम्या वाऱ्यासारखी पसरली. मात्र, विरोधकांना आयता मुद्दा मिळू नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी जाऊन बिल भरले आणि आम्ही बिल दिले असे जाहीर केले. (the minister ate vadapav and the video went viral) क्लिक करा आणि वाचा- ठाणे आणि दिव्यादरम्यान रेल्वेच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, आमदार, खासदार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्याआधी सर्व केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार आणि आमदारांनी ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचा पाहणी दौरा केला. पाहणी दौरा आटोपल्यानंतर मुंबईची ओळख असलेल्या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी त्यांनी ठाणे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या एका वडापावच्या दुकानात वडापाव आणि भजीपाववर चांगलाच ताव मारला. यावेळी सर्वजन अगदी तुटून पडलेले पाहायला मिळाले. क्लिक करा आणि वाचा- मग काय त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यानी देखील या वडापाव आणि भजीपाववर ताव मारला. या सगळ्याचे बिल झाले ३ हजार ९५० रुपये. वडापाव खाऊन झाल्यानंतर मात्र सर्वजन बिल न देताच निघून गेले. क्लिक करा आणि वाचा- याचे व्हिडियो आणि बातम्या सोशल मिडीयावर वाऱ्यासारखे पसरले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. मात्र, बिल भरले नाही हा मुद्दा विरोधकांकडून उचलला जाऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी हे बिल भरले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/wY7ZGvQ
No comments:
Post a Comment