नवी दिल्ली: ‘ हा छुपा मारेकरी (सायलेंट किलर) असून, त्यातून बरे होण्यास दीर्घ कालावधी लागतो,’ असे मत देशाचे यांनी व्यक्त केले. ( ) वाचा : सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिवक्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे प्रत्यक्ष सुनावणी सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर सरन्यायाधीशांनी हे मत मांडले. बाधित रुग्णांमध्ये आता १५ हजारांची वाढ झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ओमिक्रॉन हा सौम्य असल्याचे म्हणणे सिंग यांनी मांडले होते. त्यावर सरन्यायाधीशांनी स्वत:चेच उदाहरण देत अधोरेखित केला. वाचा : पहिल्या लाटेत आपल्याला बरे होण्यास चार दिवस लागले होते. परंतु तिसऱ्या लाटेत बरे होण्यास याहून अधिक कालावधी लागत असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले. ‘ओमिक्रॉन हा छुपा मारेकरी आहे. पहिल्या लाटेत मी चार दिवसांत बरा झालो होतो. परंतु या तिसऱ्या लाटेत २५ दिवस उलटले तरी मी पूर्ण बरा झालेलो नाही.’, असे न्यायमूर्ती रमणा म्हणाले. यावर सिंग यांनी ‘आपल्याबाबतीत दुर्दैवाने हा अनुभव आला. परंतु लोक बरे होत आहेत’ असे म्हटले असता, ‘आपण पाहू’ असे उत्तर मुख्य सरन्यायाधीशांनी दिले. १५ हजार नवे रुग्ण देशात बुधवारी १५ हजार १०२ नव्या करोनारुग्णांची नोंद झाली असून, रुग्णांची एकूण संख्या ४ कोटी २८ लाख ६७ हजार ०३१ वर पोहोचली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून १ लाख ६४ हजार ५२२ वर आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. २७८ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्यानंतर मृतांची एकूण संख्या ५ लाख १२ हजार ६२२ वर पोहोचली आहे. सलग १७व्या दिवशी रुग्णांची संख्या १ लाखाहून कमी नोंदवली गेली. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fizWIEu
No comments:
Post a Comment