लखनऊ: निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रसिद्ध शायर हे त्यांच्या काही विधानांमुळे चर्चेत आले असतानाच त्यांची कन्या उरुषा इम्रान राणा हिने थेट निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. उरुषा हिला काँग्रेसने उन्नावमधील पुरवा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तिने पहिला निशाणा यांच्यावर साधला आहे. ( ) वाचा : मुनव्वर राणा यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. 'माफिया' असा उल्लेख करतानाच योगी पुन्हा सत्तेत आल्यास आपण लखनऊ आणि उत्तर प्रदेश सोडून दुसरीकडे जाणार, अशी घोषणाच मुनव्वर राणा यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर राणा यांची कन्या उरुषा हिने आज मोठे विधान केले. 'मुनव्वर राणा हे माझे वडील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी एखादे विधान केले असेल तर त्यामागे काहीतरी ठोस कारण निश्चित आहे. राजकारणाशी त्यांचा जराही संबंध नसून जे वाटलं त्याबाबत ते परखडपणे बोलले आहेत', असे सांगतानाच १० मार्चला माझ्या वडिलांना लखनऊ सोडावं लागणार नाही तर मुख्यमंत्री योगींनाच लखनऊ सोडून परत गोरखपूरला जावं लागणार आहे, असे उरुषा म्हणाली. वडिलांनी जे सांगितलं ते त्यांचे विचार असून त्यावर मला अधिक टिपण्णी करायची नाही, असेही उरुषा म्हणाली. उरुषाने यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष यांच्यावरही टीका केली. मुस्लिम समाजाच्या हिताचे कोणतेही काम अखिलेश यांनी केले नसून त्यांनी नेहमी समाजाची फसवणूकच केली, असा आरोप उरुषाने केला. उरुषाने पुरवा येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ती माध्यमांशी बोलत होती. वाचा : दरम्यान, उरुषा राणा ही सदर येथून लढण्यासाठी इच्छूक होती. मात्र पक्षाने आशा सिंह यांना उमेदवारी दिल्याने उरुषा राणा हिने येथून अपक्ष अर्ज भरला होता. त्यातून काँग्रेसमधील गृहकलह चव्हाट्यावर आला होता. मात्र, उरुषाची मनधरणी करण्यात काँग्रेसला यश आलं असून तिला उन्नाव सदर ऐवजी पुरवा मतदारसघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज लगेचच उरुषाने अर्जही भरला. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cudUCrmLM
No comments:
Post a Comment