म. टा. प्रतिनिधी, ठाणे ठाण्यातील कापुरबावडी परिसरातील एका बोगस कॉल सेंटरवर सोमवारी मध्यरात्री ठाणे गुन्हे शाखेच्या पथकांनी छापा मारून या कॉल सेंटरमधून ३० हार्ड डिस्क, तीन रजिस्टर, तीन राउटर, फसवणुकीची स्क्रिप्ट आणि इतर साहित्य जप्त केली आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी कॉल सेंटरच्या मॅनेजरला ताब्यात घेतले असून या प्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या चौकशीमध्ये धक्कादायक बाब समोर आली. थेट अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ( raids in an was ) अमेरिकन नागरिकांना मेसेज पाठवून ३९९ डॉलर्सचा व्यवहार झाल्याचे दाखवण्यात येत होते. शिवाय हा व्यवहार केला नसल्यास अमेरिकन नागरिकांना ठाण्यातील कॉल सेंटरचा नंबर पाठवून संपर्क साधण्याविषयी सांगितले जात होते. व्यवहार रद्द करण्यासाठी अमेरिकन नागरिकांनी कॉल सेंटरला संपर्क साधल्यानंतर कॉलसेंटरमधील टेलीकॉलर्स स्क्रिप्टनुसार त्यांना वेगवेगळे ॲप डाऊनलोड करण्यास सांगत असे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर टेलिकॉलर्स पासवर्ड तयार करून हा पासवर्ड संबंधित नागरिकांना आणि मॅनेजरच्या मोबाईल नंबवर व्हॉट्सॲपद्वारे पाठवितात. मॅनेजर नंतर तो पासवर्ड कोलकत्ता येथील त्यांच्या साथीदारांना पाठवत असल्याची बाब समोर आली. या पासवर्डचा वापर करुन अमेरिकन नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी या कॉल सेंटरमध्ये २० पेक्षा अधिक टेलिकॉलर काम करताना आढळून आले आहे. मात्र, ज्यावेळी चौकशीसाठी बोलवले जाईल तेव्हा उपस्थित राहण्याची सूचना देऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे. टेलीकॉलर ठाणे, नवी मुंबई, मुंबई परिसरात राहतात. सर्व संगणकांना एकच पासवर्ड... पोलिसांच्या पथकाने कॉलसेंटरची घेतलेल्या झडतीमध्ये १७ टेबलवर एकूण ३० संगणक संच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच प्रत्येक संगणकासाठी एक टेलीफोनही होता. शिवाय सर्व संगणकांना एकच पासवर्ड ठेवण्यात आल्याची बाब समोर आली. तर एका संगणकात कॉलसेंटरमधील टेलीकॉलर्स अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारी स्क्रिप्ट आढळून आली. आर्थिक फसवणूकीच्या चौकशीसाठी पोलिसांनी सर्व ३० सीपीयूमधून हार्डडिस्क काढून घेतल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- खंडणी विरोधी पथकाला मिळाली माहिती... कापुरबावडी परिसरात असलेल्या या बोगस कॉलसेंटरचे चालक, मालक अनेक नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. आणि या कारवाईसाठी गुन्हे शाखा युनिट एकची मदत घेण्यात आली. मंगळवार पहाटेपर्यंत ही कारवाई चालली. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IJxnQChwg
No comments:
Post a Comment