Breaking

Wednesday, February 9, 2022

रिषभ पंत तिसऱ्या सामन्यातही सलामीला येणार का, रोहित शर्माने स्पष्टच सांगितले… https://ift.tt/nEAcPRU

अहमदाबाद : रिषभ पंतला दुसऱ्या सामन्यात आपल्याबरोबर सलामीला आणत कर्णधार रोहित शर्माने सर्वांनाच मोठा धक्का दिला. पंत सलामीला आला आणि भारताने सामना जिंकला. जिंकल्यावर कोणताही संघ शक्यतो आपील संघ आणि क्रम बदलत नाही. त्यामुळे आता रिषभ तिसऱ्या सामन्यातही सलामीला येणार का, याबाबत रोहितने आता स्पष्ट भूमिका मांडली आहे. पहिल्या वनडे सामन्यात इशान किशन सलामीला आला होत्या आणि त्याने २८ धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या सामन्यात लोकेश राहुल संघात येणार असल्याने इशानला संघाबाहेर जावे लागले. दुसऱ्या सामन्यासाठी राहुल संघात आला खरा, पण त्याला सलामीला न पाठवता पंतला सलामीला करण्याची यावेळी संधी देण्यात आली. पंतला मोठी खेळी साकारता आली नसली तरी राहुलने मधल्या फळीत चांगल्या धावा केल्या, पण त्याचे अर्धशतक फक्त एका धावेने हुकले. त्यामुळे भारतीय संघ आता हाच क्रम तिसऱ्या सामन्यातही कायम ठेवणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडला असेल. यावर रोहितने सामना संपल्यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. रोहित म्हणाला की, " आम्ही सध्याच्या घडीला दिर्घकाळाचा विचार करत आहोत, त्यामुळे या प्रक्रीयेत एखादा सामना गमावावा लागला तरी संघात प्रयोग मात्र सुरुच राहणार. यापुढेही रिषभ पंतला सलामीला पाहायला लोकांना आवडेल, पण ही गोष्ट कायमस्वरुपी नाही." पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात भारताने सलामीवीराची जोडी कायम ठेवली नाही. दोन्ही सामन्यांमध्ये डावखुरे सलामीवीरच रोहित शर्माबरोबर मैदानात उतरले. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माबरोबर सालमीला कोण उतरणार, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. तिसऱ्या सामन्यात शिखर धवनही सलामीला येऊ शकतो, असे संकेतही रोहितने यावेळी दिले आहे. धवन आता करोनामधून बाहेर पडला असून तो फिट आहे. त्यामुळे त्याच्या नावाचा विचार तिसऱ्या वनडे सामन्यासाठी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आता तिसऱ्या वनडेमध्ये रोहितबरोबर सलामीला रिषभ पंत येणार की शिखर धवन यांची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/9UskMwn

No comments:

Post a Comment