Breaking

Thursday, February 10, 2022

हिंगणघाट प्रकरणातील नराधमाला जन्मठेप नको, फाशी व्हायला हवी : काँग्रेस आ. प्रतिभा धानोरकर https://ift.tt/qZec81F

चंद्रपूर : हिंगणघाट जळीतकांडातील अंकिताच्या मृत्यूला आज दोन वर्ष पूर्ण झालीत. आरोपी विकेश नगराळेला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या निर्णयाचं मी महिला आमदार म्हणून आभार मानते. मात्र अशा प्रकरणात फाशीची शिक्षा होणे अपेक्षित आहे, असं मत काँग्रेस आमदार यांनी व्यक्त केलं. हिंगणघाट जळीतकांडात आरोपी विकेश नगराळे याच्यावर न्यायालयाने बुधवारी खुनाचा गुन्हा सिद्ध केल्यानंतर आज न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हिंगणघाटपासून १५ किलोमीटर अंतरावरील दरोडा येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. मोर्चे, आंदोलन करुन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. काही दिवसांच्या आताच आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं होतं. आरोपीला जन्मठेपेची नाही तर फाशीची शिक्षा व्हायला हवी. हिंगणघाट येथील झालेला प्रकार हा अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रात पुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी अश्या नराधमाला कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे या नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पुढे प्रयत्न करायला हवे. या प्रकरणात शासकीय अधिवक्ता म्हणून उज्वल निकम यांनी काम बघितले. त्यांचे देखील मी या निमित्याने आभार मानते. नेमकं काय घडलं होतं? पीडिता हिंगणघाटच्या स्व. आशा कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होती. यामध्ये पीडिता ३ फेब्रुवारीला २०२० ला सकाळी तिच्या गावाहून बसने हिंगणघाटला पोहोचली. नंदोरी चौकातून कॉलेजच्या दिशेने जाताना आरोपी विकेश नगराळे दबा धरुन बसला होता. पीडिता दिसताच विकेशने अगोदरच दुचाकीतील काढलेले पेट्रोल तिच्यावर ओतले आणि तिला पेटवले. यात गंभीररित्या जळालेल्या पीडितीचा नागपूरातील ऑरेंजसिटी रुग्णालयात मृत्यू झाला. ८ दिवस जीवन मरणाशी तिचा संघर्ष सुरु होता. या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zNcHmCb

No comments:

Post a Comment