Breaking

Wednesday, February 23, 2022

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात होणार तीन मोठे बदल, जाणून घ्या कोणाला मिळणार संधी https://ift.tt/niuYmQX

लखनौ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी सज्ज झाला आहे. या पहिल्याच सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल होऊ शकतात. पहिला बदल... पहिल्या सामन्यापूर्वी भारताला सूर्यकुमार यादवच्या रुपात मोठा धक्का बसला आहे. सूर्यकुमार हा या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात सूर्यकुमारच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळू शकते. संजू हा धडाकेबाज फलंदाज आहे, त्याचबरोबर तो यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याचबरोबर सूर्यकुमार जसा मधल्या फळीची जबाबदारी यशस्वीपणे पेलवत होता, तशीच भूमिका संजूबी निभावू शकतो. संजूला आतापर्यंत सातत्याने संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळे या मालिकेत संजूला संधी दिली तर तो कशी कामगिरी करतो, हे संघ व्यवस्थापनाला पाहता येऊ शकते. दुसरा बदल... श्रीलंकेविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी भारताचा अष्टपैलू दीपक चहर हा दुखापतग्रस्त झाला आहे. दीपकच्या पायाचे स्नायू ताणले गेले आहेत, त्यामुळे तो या मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे दीपकच्या जागी आता संघात रवींद्र जडेजाला संधी मिळू शकते. जडेजा हा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. जवळपास दोन महिने तो भारताकडून एकही सामान खेळू शकला नव्हता. पण आता जडेजा पूर्णपणे फिट झाला आहे. जडेजाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे दीपकसारखा अष्टपैलू खेळाडू संघात नसताना त्याच्या जागी जडेजा संघात येईल. त्यामुळे जडेजा आता भारतीय संघात पुनरागमन करताना कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. तिसरा बदल... वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा युवा वेगवान गोलंदाज अवेश खान चांगलाच महागडा ठरला होता. त्यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. त्यामुळे अवेशच्या जागी भारतीय संघात आता उपकर्णधार जसप्रीत बुमराचे पुनरागमन होऊ शकते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी बुमराला विश्रांती देण्यात आली होती. पण बुमराचे आता संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर बुमराकडे आता संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळे बुमरा आता ही नवीन जबाबदारी कशी पार पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर बुमराचे संघात बऱ्याच दिवसांनी पुनरागमन होणार आहे. त्यामुळे बुमराच्या गोलंदाजीतील भेदक आणि अचूकपणा कसा आहे, हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात ही तीन मोठे बदल होऊ शकतात. असा आहे भारताचा संभाव्य संघ


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/mYp9FOT

No comments:

Post a Comment