Breaking

Wednesday, February 9, 2022

आदित्य पांचोलीच्या विरोधात गुन्हा दाखल, निर्मात्याने केली तक्रार https://ift.tt/P6uAZDS

मुंबई : सिनेनिर्माते सॅम फर्नांडिस यांनी अभिनेता विरोधात शिवीगाळ आणि मारहाण करत जीवे मारण्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मारहाण केल्याप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सॅम फर्नांडिस यांची तक्रार सिनेनिर्माते सॅम फर्नांडिस यंनी आरोप केला की, '२०१९ मध्ये सूरजला घेऊन मी 'हवा सिंह' या सिनेमाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या सिनेमाचे १२ दिवस चित्रीकरणही झाले. परंतु त्यानंतर लॉकडाऊनमुळे काम थांबले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरजला घेऊन सिनेमा करण्यास नकार दिला. मी याबाबत सुरजला सांगितले. त्याने देखील अन्य अभिनेत्याला घेऊन सिनेमा करू शकतो, असे सांगितले. परंतु त्याचे वडील आदित्य पांचोली याने सांगितले की, आपण एकत्रच काम करू या. सिनेमासाठी फायनान्सर ते घेऊन येतील. परंतु असे काहीच झाले नाही.' 'त्याने सिनेमासाठी काही पैसे दिले परंतु ते पुरेसे नव्हते. हा सिनेमा भारतामधील हेवीवेट बॉक्सरच्या आयुष्यावर आधारीत आहे. या सिनेमासाठी आमचे बजेट २५ कोटी रुपये इतके होते.' सॅम याने पुढे सांगितले की, '२७ जानेवारीला आदित्यने मला भेटायचे असल्याचे सांगत हॉटेलमध्ये बोलावले. मी तिथे गेलो. परंतु त्याच्या खोलीमध्ये अन्य काही लोक बसली होती. त्यामुळे आम्ही कॉरिडोअरमध्ये जाऊन बोलले. त्यावेळी त्याने मला सांगितले की, सुरजलाच घेऊन तुला हा सिनेमा करायचा आहे. जर मी असे केले नाही तर हा सिनेमा मी तुला करू देणार नाही. त्यानंतर त्याने मला शिव्या दिल्या आणि मारले. त्यानंतर मी तिथून निघालो तेव्हा त्याने पाठीमागून मला लाथ मारली. त्यानंतर मी सरळ पोलीस ठाण्यात गेलो आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.' काय म्हणाला आदित्य पांचोली सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोलीविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याबाबत आदित्य पांचोलीने सांगितले की, सॅमने जे काही आरोप केले आहेत ते चुकीचे आहेत. उलट सॅमने माझ्याकडून मोठी रक्कम घेतली होती. हे पैसे घेताना त्याने जर मला पैसे दिले नाही तर सर्व काही संपून जाईल. त्याने हे सगळे इतक्या भावुकपणे सांगितले त्यामुळे मी बायको-मुलांच्या खात्यातून ९० लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर तो मला २७ जानेवारी भेटला. त्यावेळी तो माझ्या कुटुंबाला आणि सुरजबद्दल वेडेवाकडे बोलू लागला. इतकेच नाही तर त्याने माझ्याकडून पैसे देखील मागितले. मी त्याला म्हटले आधी घेतलेले पैसे परत दे. परंतु त्याने याला नकार दिला. त्याने माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे मला समजले. मी देखील त्याच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे. आदित्य पांचोलीने केलेल्या अर्जासोबत बँक स्टेटमेंटही जोडले आहे. त्यामध्ये त्याने सॅमला जे पैसे दिले आहेत, त्याची सविस्तर माहिती आहे. त्यावर सॅम फर्नांडिसने सांगितले की, त्याने मला जे पैसे दिले होते ते माझ्या व्यक्तिगत कामासाठी नाही तर त्याच्या मुलासाठी दिले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PQLFSpg

No comments:

Post a Comment