नवी दिल्ली: भारतरत्न दिवंगत यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जारी करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्याचवेळी आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनीही लतादीदींचा गौरव करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यावर बोट ठेवत भाजपचे मुंबईतील खासदार यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला बोचरा सवाल केला आहे. ( ) वाचा : लतादीदींच्या सन्मानार्थ केंद्र सरकार तसेच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील भाजप सरकारने मोठे निर्णय घेतले असताना असे कोणतेच पाऊल उचलत नसल्याबद्दल मनोज कोटक यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे व त्यावरून थेट प्रश्नही विचारले आहेत. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने अद्याप लतादीदींच्या सन्मानार्थ कोणतीही घोषणा का केली नाही? सरकारला त्यासाठी कुणी रोखलं आहे? महाराष्ट्र सरकारला नेमकी कशाची भीती वाटत आहे?, अशा प्रश्नांची सरबत्ती करताना मनोज कोटक यांनी वेगळीच शंका व्यक्त केली. लता मंगेशकर या वीर सावरकरांचा आदर करायच्या. त्या कारणामुळेच महाराष्ट्र सरकार लतादीदींचा यथोचित सन्मान करण्यास कचरतं आहे की काय?, असा सवाल कोटक यांनी केला. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेची कशी कुचंबणा झाली आहे, हे सांगण्याचाही कोटक यांनी या माध्यमातून प्रयत्न केला. वाचा : या आहेत त्या घोषणा... भाजपने उत्तर प्रदेशच्या निवडणूक जाहीरनाम्यात लतादीदींच्या गौरवार्थ घोषणा केल्या आहेत. राज्यात भाजपचं सरकार आल्यास लता मंगेशकर यांच्या नावाने योजना सुरू केल्या जातील व कला अकादमी उभारण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. तर लतादीदींचा जन्म इंदूरचा असल्याने मध्य प्रदेश सरकारनेही अनेक घोषणा केल्या आहेत. इंदूर येथे संगीत अकादमी, संगीत महाविद्यालय आणि संगीत संग्रहालय उभारण्यात येणार आहे तसेच लतादीदींच्या जन्मदिनी दरवर्षी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Kr8GAcf
No comments:
Post a Comment