Breaking

Wednesday, February 23, 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इडी, केंद्र सरकारचा निषेध; मुंबई इडी कार्यालयाकडे केले कूच https://ift.tt/vRw60Bb

ठाणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मुख्य प्रवक्ता यांना आज दुपारी इडी कडून अटक झाल्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे याचा निषेध व्यक्त करत इडी कार्यालयाच्या दिशेने कूच केली आहे. ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून २५ गाड्या या इडीच्या मुंबई येथील कार्यालयावर रवाना झाल्या आहेत. यावेळी ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. (after the arrest of the ncp in thane protested against the ed and the central government) राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना इडी कडून अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाच्या बैठकी सुरु झाल्या. हे होत असताना राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हजारो कार्यकर्ते या गोष्टीचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्यानंतर ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील आता या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी इडी च्या मुंबई कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी ठाण्यातून तब्बल २५ गाड्या मुंबई इडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. यावेळी संतप्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. क्लिक करा आणि वाचा- ‘इडी झाली वेडी’ आणि ‘केंद्र सरकार हमसे डरती ही, इडी को आगे करती है..’ अशा घोषणा यावेळी संतप्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे देण्यात आल्या. ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांच्या नेतृवाखाली हा निषेध नोंदवत मुंबई येथील इडी कार्यालयावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कूच केली होती. क्लिक करा आणि वाचा- राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केंद्र सरकार हा बळाचा वापर करत असल्याचा आरोप करत ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगत ठाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. मात्र दिल्लीच्या तक्ता पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही हा इतिहास असल्याचे सांगत केंद्र सरकारचा हा बळ प्रयोग महाराष्ट्राची जनता सहन करणार नसल्याचे ठाण्यातील राष्ट्रवादी कॉंगेसकडून सांगण्यात आले आहे. अशा प्रकारे इडी किंवा इन्कम टॅक्सची लाख कारवाई केली तरी महाविकास आघाडी ही ५ वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला गेला. क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांना ज्यावेळी इडी कडून चौकशीसाठी बोलावले होते त्यावेळी देखील आम्ही रस्त्यावर उतरलो होतो आणि महाविकास आघाडीतील कुठल्याही नेता किंवा कार्यकर्त्याच्या विरोधात इडीचा वापर करून कारवाई केली तर आम्ही त्याच्या विरोधात निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा ठाणे महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अश्रफ (शानू) पठाण यांनी दिला आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Plu9VaI

No comments:

Post a Comment