कीव्ह: रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये घुसली आहे. स्वत: युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक निवेदनाद्वारे रशियन लष्काराचे टॅक, लष्करी गाड्या कीव्हच्या रस्त्यावरून फिरत असल्याचे दाखवले आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत रशियाच्या लष्कराने बेलारुसच्या मार्गे राजधानी कीव्हची नाकेबंदी केली होती. परिस्थिती खराब होत चालल्याचे पाहून युक्रेनने नागरिकांना लष्करात दाखल होण्याचे आवाहन केले. दरम्यान रशियाने कीव्हच्या बाहेरच्या भागात असलेल्या गोस्टोमेल एअरफिल्डवर ताबा मिळवल्याचे वृत्त समोर येत आहे. यामुळे रशियाला तेथील स्वत:च्या जवानांना शस्त्रे, रसद आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्यास अधिक सोपे होणार आहे. रशियाच्या संरक्षण मंत्राल्याने गोस्टोमेल एअरफिल्डवर दाबा मिळवल्याचे म्हटले आहे. तर अमेरिकने दावा केला आहे की या एअरफिल्डवर युक्रेनचे २०० जवान मारले गेलेत. वाचा- ... पुढे काय? युक्रेनची राजधानीमध्ये रशियाचे लष्कर घुसल्यानंतर आता राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन पुढे काय करणार याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या पुतिन यांचा काय डाव आहे. गुरुवारी पुतिन यांनी युक्रेनमध्ये स्पेशल लष्करी ऑपरेशन करणार असल्याचे जाहीर केले. काही तासातच रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या १०० लष्करी ठिकाण नष्ट केली. इतक नाही तर रशियाने युक्रेनच्या एअर डिफेंन्स पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर रशियाच्या लढाऊ विमानांनी युक्रेनमध्ये सहज प्रवेश केला आणि ऑपरेशन यशस्वी केले. काळ्या सुमद्रामार्गे रशियाच्या नौदलाने युक्रेनवर हल्ला केला. तिन्ही बाजूंनी हल्ला झाल्यावर युक्रेनचा पराभव निश्चित झाला. रशियाने केलेल्या दाव्यानुसार डोनबास क्षेत्रात युक्रेनच्या अनेक जवानांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. वाचा- उडवणारी पुतिन पुढे काय करणार रशियाचे सैन्य कीव्हमध्ये घुसल्यानंतर पुतिन पुढे काय करणार याची चर्चा सुरू झाली आहे. पुतिन वोलोडिमिर जेलेंस्की यांचे सरकार पाडून लष्कर पुन्हा माघारी बोलवणार का की रशियाचे समर्थन असलेले सरकार अस्तित्वात येईपर्यंत सैन्य युक्रेनमध्येच थांबेल. काही लोकांच्या मते डोनबास क्षेत्रातील दोन प्रांतांवर पूर्ण ताबा मिळवल्यानंतर रशियाचे लष्कर माघारी परतेल. त्याच्या मते कीव्हवर हल्ला करण्याचा रशियाचा प्लॉन नव्हता. फक्त अमेरिकेला कठोर संदेश देण्यासाठी ही कारवाई केली गेली. अमेरिकेने थेट रशियाला यासाठी जबाबदार ठरवले होते. युक्रेन देखील अमेरिकेच्या प्रभावाखाली येऊन रशियाला आव्हान देत होते. यामुळे पुतिन यांनी युक्रेनला कठोर संदेश द्यायचा होता. धडा शिकवायचा आहे जाणकारांच्या मते रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांना युक्रेनला धडा शिकवायचा आहे आणि त्यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी देखील झालेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी अमेरिकेची प्रतिमा खराब झालीय. अमेरिकेच्या जोरावर युद्धाची धमकी देणाऱ्या देशांना आता सत्य परिस्थिती लक्षात आली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी २०१९ साली पद स्विकारल्यानंतर अमेरिकेशी संबंध मजबूत करण्यास सुरुवात केली होती. इतक नाही तर त्यांनी रशियाला भडकवण्यासाठी युक्रेनच्या राज्यघटनेत संशोधन केले. यामध्ये युक्रेनला युरो आणि नाटोचे सदस्यत्व मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. हीच गोष्ट होती ज्यामुळे रशियाला वाटले की आता लष्करी कारवाई शिवाय अन्य कोणतीही भाषा ते समजणार नाहीत. २०२१च्या एप्रिल महिन्यात रशियाच्या लष्कराने युक्रेनच्या सीमेवर धडक मारली होती. पण काही महिन्यांत ते मारली होती. डोनबासवर ताबा पुतीन यांना युक्रेनच्या ताब्यातून डोनबास हा प्रांत काढून घ्यायचा आहे. त्यांनी आधीच डोनेट्स्क आणि लुहान्स्क यांना स्वतंत्र मान्यता दिली आहे. युक्रेनवरील कारवाईने पुतीन यांनी सोवियत देशांना एक कठोर संदेश दिला आहे की या देशांनी अमेरिकेच्या जवळ किंवा नाटोमध्ये सामील होण्याआधी १० वेळा विचार करावा.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/cgbmiYr
No comments:
Post a Comment