Breaking

Friday, February 25, 2022

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांची जीभ घसरली, अमृता फडणवीसांचा केला आक्षेपार्ह उल्लेख https://ift.tt/eQOkFnU

नवी मुंबई: नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष () यांनी केलेल्या (Amruta Fadnavis) यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपच्या चांगल्याच भडकल्या आहेत. गावडे यांच्या विरोधात भाजप आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. अशोक गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू देणार नाहीत, अशा इशारा मंदा म्हात्रे यांनी दिली आहे. (district president of navi mumbai used offensive language about ) वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांवर ईडी ने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू असताना नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध मुख्य पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. मात्र राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे भाषण करत असताना त्याची जीभ घसरली. आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. क्लिक करा आणि वाचा- गावडे यांच्या वक्तव्याचा भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे निषेध केला आहे. अशोक गावडे यांनी निदर्शने करता अपशब्द वापरले ते तोंडातही घेऊ शकत नाही. नवी मुंबईकरांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. महिलांना अपशब्द वापरणे हे आपल्या कोणत्या संस्कृतीत आणि संस्कारात बसते, हे त्यांनी लोकांना सागितले पाहिजे. उद्या आम्ही त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणारच आहोत. त्यांच्यावर अनेक गुन्हे असतानाही आज ते नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याविरोधात ज्या तक्रारी आहेत त्या काढल्या तर कोणताही पक्ष त्यांना जिल्हाध्यक्ष करू शकत नाही, असे मंदा म्हात्रे म्हणाल्या. क्लिक करा आणि वाचा- आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई करावी की करू नये हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, आम्ही उद्या त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार करणार आहोत आणि त्यांना नवी मुंबईतही फिरू देणार नाही. त्यांच्या तोंडाला जर काळे फासले नाही, तर मी नावाची मंदा म्हात्रे नाही, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/SNP9f0e

No comments:

Post a Comment