Breaking

Thursday, February 3, 2022

...म्हणून ओवेसींवर गोळ्या झाडल्या!; हल्लेखोरांनी दिली धक्कादायक कबुली https://ift.tt/x0CwIzPyQ

मेरठ: उत्तर प्रदेशात खासदार व एमआयएम अध्यक्ष यांच्या कारवर गोळ्या झाडणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी काही तासांतच अटक केली असून त्यांच्या तपासात हल्ल्यामागचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. ओवेसी यांच्यावर नियोजनबद्धपणे हल्ला करण्यात आल्याचेही दिसून येत आहे. ( ) वाचा : निवडणुकीत ओवेसी यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार उतरवले असून येथे ते आज प्रचारासाठी आले होते. तिथून परतत असताना हापुडमधील येथे ओवेसी यांच्या कारवर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळ्या झाडल्या. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ओवेसी व कारमधील त्यांचे अन्य सहकारी थोडक्यात बचावले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर काही तासांतच दोन्ही आरोपींना पकडण्यात यश आले आहे. एक हल्लेखोर पळत असताना ओवेसींच्या ताफ्यातील दुसऱ्या कारला धडकला होता. त्याला काही वेळातच अटक करण्यात आली तर दुसरा हल्लेखोर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. सचिन आणि शुभम गुर्जर अशी या दोघांची नावे असून एक जण नोएडातील आहे तर दुसरा सहारनपूरमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाचा : पोलिसांकडून या दोघांची कसून चौकशी सुरू असून त्यांनी धक्कादायक कबुली दिली आहे. असदुद्दीन ओवेसी हे सातत्याने हिंदूंच्या विरोधात विधाने करत असतात. त्या रागातूनच त्यांच्यावर हल्ला केला असे या दोघांनी तपासादरम्यान सांगितल्याचे दलातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून या हल्ल्याच्या कटात हे दोघेच सहभागी होते की त्यांना इतर कुणाची साथ होती, याचा शोधही पोलीस घेत आहेत. दरम्यान, एका खासदारावर अशाप्रकारे हल्ला होत असेल तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने ती अत्यंत गंभीर बाब असून याची स्वतंत्रपणे चौकशी व्हायला हवी. निवडणूक आयोग, उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार या सर्वांचीच ही जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे. अशा हल्ल्यांनी मी घाबरणार नाही. या घटनेबाबत उद्या लोकसभाध्यक्षांना कल्पना देणार आहे आणि त्यानंतर शुक्रवारपासून पुन्हा उत्तर प्रदेशात प्रचार करणार आहे, असे ओवेसी म्हणाले. वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/jJ10rzXau

No comments:

Post a Comment