ठाणे: उद्या गुरुवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. सत्तेवर असलेली नेतेमंडळी त्यांचा राजीनामा घेत नाही, मग अधिवेशनात त्यांच्या खातेविषयी काही प्रश्न समोर आले, तर मग काय त्यांच्यासाठी जेलमध्ये स्क्रीन लावणार का?, असा सवाल भाजपचे विरोधीपक्ष नेते यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. एका खाजगी कार्यक्रमासाठी दरेकर हे ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. (opposition leader criticizes and ) महाविकास हे हुकूमशाही पद्धतीने आणि अहंकाराने भरलेले सरकार आहे. बॉम्ब स्फोटातील दाऊदच्या संबंधातील आरोपी शहावली खान आणि सलीम पटेल त्यांच्याकडून ३०० कोटीची जागा १०-१५ लाखाला विकत घेऊन नवाब मलिक यांचा संबंध आला आहे. हा प्रकार गंभीर असून हा प्रश्न राष्ट्रवादाचा असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. ज्याठिकाणी देश विघातक प्रवृत्ती येतात तेव्हा 'झुकेगा नही' अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे या सरकारचा अहंकार असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारकडून रोज एकच आरोप केला जात आहे. परंतु, कारवाई चुकीची की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो न्याय व्यवस्थेला आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीचे आदेश हे न्यायालयाने मालिकांना दिले असून भाजपने ते दिलेले नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा या कोणाच्या इशाऱ्यावर चालत नसतात, जेव्हा कॉंग्रेस सरकार होते त्यावेळी देखील अशा प्रकारे मंत्र्यांवर कारवाई झाल्या. धाडी पडल्या. मग त्यावेळी आम्ही काय केले? मग आता तुमच्यावर जे आरोप होतायत त्याचे उत्तर जनतेला आणि न्यायालयाला द्या, त्याचे खापर केंद्र सरकार, तपास यंत्रणा आणि भाजपवर कशाला फोडता?, असा सवाल दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. क्लिक करा आणि वाचा- लवकरच अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थित नवाब मलिक यांना आम्ही राजीनामा देण्यासाठी भाग पाडणार असल्याचा इशारा यावेळी दरेकर यांनी दिला. कारण, जर नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत. त्यांच्याकडे कॉबिनेट मंत्री पद आहे. भाजप विरोधी पक्षात आहे आम्ही प्रश्न विचारला तर नवाब मलिक याचं उत्तर कुठून घ्यायचं असा सवाल दरेकर यांनी उपस्थित करत आमचे उत्तर मिळवण्यासाठी आम्ही जेल मध्ये जायचं की जेलमध्ये स्क्रीन लावणार का? याचा विषय सरकार करत नाही नवाब मलिक यांच्या खात्यांच्या प्रश्नांची जबाबदारी कोण घेणार असा सवाल भाजपचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारसमोर उपस्थित केला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा दरेकर यांनी दिला आहे. क्लिक करा आणि वाचा- नवाब मलिक यांच्या संबंधात राज्याचे यांनी त्यांचा ठाकरी बाणा दाखवावा. बाळासाहेब ठाकरे असताना अण्णा हजारे यांनी केवळ आरोप केले होते. त्यावेळी बबन घोलप, शशिकांत सुतार यांचे राजीनामे घेतले होते. हा ठाकरीपणा मुख्यमंत्र्यांनी दाखवावा की केवळ सत्तेसाठी ही हतबलता आहे हे जनतेसमोर स्पष्ट करा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना दरेकर यांनी केले आहे. एकेकाळी शरद पवार यांच्या विरोधात बोलत होते. तसेच तत्कालीन विरोधी पक्षाला चोर दरोडेखोर बोलणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून चोर दरोडेखोरांच्या पंक्तीला सत्तेत आहेत आणि जो देशद्रोह्यांशी संबंधित आहे, त्या चोराला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला दरेकर यांनी लगावला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hSlKq7H
No comments:
Post a Comment