लंडन: दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, खेळणी, ‘यूज अँड थ्रो’ काटे-चमचे यातील आढळून आले आहेत. एका संशोधकांच्या गटाने याबाबतचे संशोधन केले असून, रक्तात आढळण्याची ही पहिलीच घटना असल्याने जगभर याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ( ) वाचा : दैनंदिन जीवनात आपण वापरत असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंमधील अत्यंत बारीक तुकडे मानवी शरीरातील रक्तामध्ये आढळून आले असल्याचे संशोधन ‘ ’ या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन टेरेफ्थालेट (पीईटी), पॉलिथीन आणि पॉलिमर्स हे रक्ताच्या नमुन्यांमध्ये आढळणारे प्लास्टिकचे सर्वांत सामान्य प्रकार होते. पॉलिप्रॉपीलिनचेही विश्लेषण केले गेले. मात्र, मोजमापासाठी ते अत्यंत कमी होते. ‘मानवी शरीरातील रक्तात असल्याचे आता सिद्ध झाले आहे,’ असे अॅमस्टरडॅम येथील व्रिजे विद्यापीठातील इकोटॉक्सिकॉलॉजिस्ट (पर्यावरणातील प्रदूषणासंबंधी संशोधन करणारे) यांनी सांगितले. मानवी रक्तातील प्लास्टिकच्या मायक्रो आणि नॅनो कणांचा माग काढण्यासाठी संशोधकांच्या गटाने विश्लेषण पद्धती शोधून काढली आहे. वाचा : मानवी शरीरातील रक्तात आढळलेल्या प्लास्टिकवर अधिक संशोधन होण्याची गरज असून, यामुळे प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न किती मोठा आणि गंभीर आहे, हे सहज आढळून येईल. प्लास्टिकच्या कणांमुळे सार्वजनिक जीवनात नेमका किती धोका आहे, हेही अधिक संशोधनामुळे लक्षात येईल. असा झाला अभ्यास... - सोड्याच्या आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये ‘पीईटी’ आढळते; तसेच कंटेनर, दुधाच्या बाटल्यांमध्ये आणि वाणसामानाच्या पिशव्या, खेळणी यांच्यात पॉलिथिलीन, तर टाकाऊ चाकू, सुऱ्यांमध्ये पॉलिमर आढळते. - अभ्यासात २२ सहभागींचा समावेश होता. त्यांच्या रक्तातून पाच विविध प्रकारच्या पॉलिमरची तपासणी करण्यात आली. - दैनंदिन पर्यावरणातूनही माणसांच्या शरीरात प्लास्टिक शोषले जात असल्याचे प्रयोगशाळेतील प्रयोगांवरून दिसून आले. - २२ रक्तदात्यांमध्ये मिळून १.६ मायक्रोग्रॅम इतके प्लास्टिक आढळले. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uJKiDkd
No comments:
Post a Comment