Breaking

Friday, March 25, 2022

माजी आयपीएस रवींद्र पाटीलने घेतले २४० बिटकॉईन; पोलिसांनी जप्त केले ६ कोटींचे बिटकॉईन https://ift.tt/X4xSq6v

म. टा. प्रतिनिधी, पुणे, अधिकारी याने डेटाचा गैरवापर करून २४० घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत पोलिसांनी सहा कोटी रूपये किंमतीचे बिटकॉईन व इतर चलन जप्त केले आहेत. (former ips misused data and took 240 ) देशभरात गाजलेल्या बिटकॉईन या आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) फसवणूक प्रकरणात सायबर तज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड) आणि रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) यांची नेमणूक करण्यात आली होती. या गुन्ह्याच्या तपासात त्यावेळी अटक केलेल्या आरोपींकडील डेटाचा गैरवापर करून या दोघांनी परस्पर बिटकॉईन घेतल्याचे आढळून आले आहे. पाटील याच्याकडे केलेल्या तपासात त्याने आतापर्यंत २४० बिटकॉईन घेतल्याचे आढळून आले आहे. घेतलेल्या बिटकॉईच्या रकमेतून त्याने १२ कोटी रूपये किंमतीचे दोन फ्लॅट, एक मोटार घेतल्याचे तपासात आढळले आहे. त्यामुळे ही मालमत्ता जप्त केली जाणार आहे. क्लिक करा आणि वाचा- पाटील याने गैरमार्गाने घेतलेले काही बिटकॉईन त्याची पत्नी व भाऊ यांच्या नावावर पाठविल्याचे दिसत आहे. ते बिटकॉईन जप्त करण्यासाठी त्याचे गोपणीय क्रमांक पत्नीला माहिती असल्याचे तो सांगत आहे. पण, त्याची पत्नी व भाऊ हे फरार असून त्यांनी न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात दोघांना ही आरोपी केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आणखी काही बिटकॉईनची माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी पंकज घोडे याने देखील काही बिटकॉईन घेतल्याचे दिसून आले आहे. मात्र, तो तपासात सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्याकडे सापडलेल्या डेटांचे विश्लेषण सुरू आहे. त्यामधून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/kqMWQcE

No comments:

Post a Comment