कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभेत गदारोळ घातल्याप्रकरणी सभागृहातील विरोधी पक्षनेते ( ) यांच्यासह भाजपच्या पाच आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष यांनी सोमवारी निलंबित केले. अधिकारी यांच्यासह दीपक बर्मन, शंकर घोष, मनोज तिग्गा आणि नरहरी महातो यांना २०२२मधील उर्वरीत सर्व अधिवेशनांसाठी निलंबित करण्यात आले. ( ) वाचा : भाजपच्या सदस्यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालल्याचा आरोप करत मुख्यमंत्री ( ) यांनी या विषयावर निवेदन करावे अशी मागणी लावून धरली. या मुद्द्यावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यामुळे सभागृहात गदारोळ झाला. शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली २५ आमदारांनी सभात्याग केला. सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, सभागृहात गदारोळ घालण्यासाठी भाजप कांगावा करत असल्याचा आरोप तृणमूलचे नेते आणि राज्याचे मंत्री फिरहद हकीम यांनी केला. सभागृहातील धक्काबुक्कीमध्ये तृणमूल काँग्रेसचे काही सदस्य जखमी झाल्याचा दावाही त्यांनी केला. वाचा : सभागृहातील गोंधळ आणि धक्काबुक्कीच्या प्रकाराची गंभीर दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष बिमन बंदोपाध्याय यांनी कारवाईचे पाऊल उचलले. बंदोपाध्याय यांनी शुभेंदू अधिकारी, दीपक बर्मन, शंकर घोष, मनोज तिग्गा आणि नरहरी महातो अशा भाजपच्या पाच सदस्यांना निलंबित केले आहे. या वर्षातील उर्वरित सर्वच अधिवेशनांसाठी हे निलंबन असल्याने २०२२ मध्ये या सदस्यांना परत सभागृहात प्रवेश नसेल हे स्पष्ट झाले आहे. वाचा :
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Jo2gZdz
No comments:
Post a Comment