डोंबिवली: डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप मध्ये राजकरण पेटले असताना आता ग्रामीण परिसरात पाणी प्रश्नावरून शिवसेना-मनसे मध्ये वातावरण तापल्याचे दिसून आले आहे. (Dispute over water issue between and in Dombivali) काल रात्री साडे आठच्या सुमारास पिंपळेश्वर मंदिराजवळ पाण्याच्या प्रश्नावरून आणि पदाधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. या वादाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी मनसेचे ओम लोके यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा मनसे पदाधिकाऱ्याने आरोप केला. तर हे आरोप म्हात्रे यांनी फेटाळले. मनसे पदाधिकाऱ्यांकडून कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न असून त्याची स्टंटबाजी सुरू केली आहे, असे म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे आता याच विषयावरून शिवसेना-मनसे राजकीय वाद होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, याबाबत मनसे आक्रमक झाली असून पक्षाने या प्रकरणी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, याबाबत शिवसेना ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. त्यातल्यात्यात नांदिवली टेकडी हा भाग जास्त बाधित आहे. म्हणून तातडीची उपाययोजना व्हायला पाहिजे. यासाठी पालिकेने पिंपळेश्वर येथील पाण्याच्या टाकीवरून पाणी घेऊन ते नांदिवली टेकडी परिसराला दयायचे असा प्रशासनाचा निर्णय झाला आणि त्याचे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही आणि अधिकारी वर्ग जागून काम करत आहोत. अशा परिस्थितीत हे काम पूर्ण होत आले आहे आणि येत्या काही दिवसांत नागरिकांना पाणी सुद्धा मिळेल. क्लिक करा आणि वाचा- ही खबर काही कार्यकर्त्यांना लागली आणि ओम लोके पाण्याच्या टाकीवर येऊन मुद्दामहून अडचण आणण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोपही म्हात्रे यांनी केला. लोके यांनी मी एवढेच सांगितले की तुम्हाला बोलायचे असेल तर खाली येऊन बोलावे, त्यांना काम करू द्यावे. मात्र लोके खाली येत नव्हते. यावरून वाद झाल्याचे म्हात्रे म्हणाले. ही स्टंटबाजी असून दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा लोके यांचा केविलवाणा प्रयत्न होता असेही ते म्हणाले. मात्र, व्हीडीओमध्ये शिवीगाळ कुठेही नाही, असे म्हात्रे यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- तर दुसरीकडे या प्रकरणी मनसे आक्रमक झाली असून मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमचे पदाधिकारी ओम लोके यांना त्या ठिकाणी बोलवले होते आणि त्याचासोबत नागरिक पण होते. त्यामुळे कामात अडथळा आणण्याचा प्रश्नच येत नाही. ७ वर्षे प्रभागात काम केले नसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यामुळे धमकी देणे, शिवीगाळ करणे, महिला सोबत असताना अपशब्द वापरणे असा मार्ग पत्करल्याचे घरत म्हणाले. दरम्यान याप्रकरणी आम्ही डोंबिवली एसीपी जय मोरे यांची भेट घेतली असून तत्काळ कारवाई करा अशी मागणी केली आहे. या प्रकरणी जर कारवाई झाली नाही तर कायदेशीर मार्गाने लढा देणार असल्याचेही ते म्हणाले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LGQRyam
No comments:
Post a Comment