Breaking

Tuesday, March 29, 2022

समोसा महागल्याने राजीनामा; साधा समोसा ३० रुपये प्लेट केल्याने नाराजी https://ift.tt/fEQR4Nw

म. टा. प्रतिनिधी, नागपूर राजकीय कारणांमुळे सदस्यत्वाचा देणे हा प्रकार नवा नाही. मात्र, जिल्हा न्यायालयातील कँटिनमधील अधिकच महागल्यावरून वकील संघटनेच्या एका सदस्याने राजीनामा दिला आहे. ही कँटिन वकील संघटनेतर्फे चालविली जाते. अ‍ॅड. धर्मराज पी. बोगाटी, असे या वकिलाचे नाव आहे. (a member of the has resigned over the in the ) न्यायालयाच्या दुसऱ्या माळ्यावर डीबीएद्वारे कँटिन चालविली जाते. गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. वास्तविक पाहता, डीबीएच्या कँटिनने वकिलांना वाजवी किमतीत खाद्यपदार्थ पुरविणे अपेक्षित आहे. मात्र, डीबीएचे काही पदाधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप डीबीचे कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. धर्मराज बोगाटी यांनी केला. सोबतच या कारणावरूनच आपण हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. मुळात वाढती महागाई हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. घराघरांत या विषयावरून चर्चा वाढल्या आहेत. राजकीय पक्षांकडून आंदोलने होत आहेत. पण, समोसा महागल्यावरून राजीनाम्याची ही घटना चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. क्लिक करा आणि वाचा- ४० रुपये प्लेट डीबीएद्वारे साधा समोसा ३० रुपये प्लेट या दराने विकला जातो. तर दही किंवा सांभारसोबत एक प्लेट समोस्याचा दर ४० रुपये इतके आहेत. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फेसुद्धा कँटिन चालविली जाते. तिथे साध्या समोस्याचा दर २५ रुपये प्रती प्लेट तर दही किंवा सांभारसोबतच्या समोस्याचा दर ३५ रुपये प्रती प्लेट आहेत. क्लिक करा आणि वाचा- ‘जिल्हा न्यायालयात मुद्देच नाहीत’ ‘समोस्याच्या दरावरून जर कुणी राजीनामा देत असेल तर जिल्हा न्यायालयात तक्रार करण्याजोगे मुद्देच उरलेले नाहीत, असे समजतो. त्यामुळे आमच्या कार्यकारिणीने चांगले काम केले आहे, याची ही पावती आहे. सिलिंडर व पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता सगळ्याच क्षेत्रात व विशेषत: खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात महागाई वाढली आहे, हे सत्यच आहे. शहरात अनेक ठिकाणी समोस्याचे दर हे ३५ ते ४० रुपये प्लेट असेच आहेत. यात आम्ही काहीच लूट करत नाही. हे काही राजीनामा देण्याचे कारण ठरू शकत नाही’, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/r7byWVf

No comments:

Post a Comment