नवी दिल्ली : युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा याच्या निधनावर शोक व्यक्त करत आणि श्रद्धांजली वाहत पंतप्रधानांनी बैठकीला सुरवात केली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव हर्षवर्धन श्रृंगला ( ) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मी युक्रेन आणि रशियाच्या राजदुतांशी बोललो आहे आणि भारतीय विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करण्यास सांगितले आहे. खारकीव्हला लागून असलेल्या युक्रेन-रशिया सीमेवरून भारतीयांना बाहेर काढण्याचा पर्यायही आम्ही शोधत आहोत. आमचे अधिकारी संबंधित ठिकाणी पोहोचले आहेत, असे श्रृंगला यांनी सांगितले. येत्या तीन दिवसांत विमानांची २६ उड्डाणे केली जातील. C17 हे विमान उद्या पहाटे चार वाजता रोमानियाला रवाना होईल. तसेच पंतप्रधानांनी फ्रान्स, पोलंडचे अध्यक्ष आणि युरोपियन युनियनच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे. आम्ही पहिली अॅडव्हायझरी जारी केली होती, त्यावेळी युक्रेनमध्ये सुमारे २०,००० भारतीय विद्यार्थी होते. तेव्हापासून सुमारे १२,००० विद्यार्थी युक्रेन सोडून गेले आहेत. उर्वरित ४० टक्के विद्यार्थ्यांपैकी निम्मे विद्यार्थी हे युद्ध क्षेत्रात आहेत आणि अर्धे युक्रेनच्या पश्चिम सीमेवर पोहोचले आहेत किंवा त्यांच्या मार्गावर आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली. सीमेवरील शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर पडण्यासाठी का सोडत नाहीए? असा प्रश्न श्रृंगला यांना विचारण्यात आला. 'एकूण ५ लाख नागरिक सीमेवरून बाहेर पडले आहेत. आतापर्यंत ७,७०० भारतीय नागरिक निघून गेले आहेत. मात्र तिथे खूप गर्दी आहे. ते भारतीय नागरिकांना जाणीवपूर्वक रोखत आहेत, असे नाही. युद्धकाळात इतरही समस्या आहेत. आपल्या नागरिकांनी सीमेवर पोहोचावे, जेणेकरून ते कीव्ह किंवा खारकीव्ह पेक्षा तुलनेने कमी धोक्यात असतील. ४ ते ५ हजार भारतीय विमानांच्या प्रतीक्षेत आहेत', असे उत्तर श्रृंगला यांनी दिले. आपल्या सर्व नागरिकांनी कीव्ह सोडले आहे. कीव्हमध्ये आपले अधिक नागरिक नाहीत, तिथून आमच्याशी कोणीही संपर्क साधला नाही. बुखारेस्ट आणि बुडापेस्ट व्यतिरिक्त भारतीय नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी पुढील ३ दिवसांत २६ उड्डाणे नियोजित आहेत, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले. नवीनचा मृतदेह विद्यापीठातील शवागारात युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झालेल्या कर्नाटकचा विद्यार्थी नवीन शेखरप्पा याचा मृतदेह विद्यापीठातील शवागारात ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात आज आधी कर्नाटकातील त्याच्या पालकांशी आम्ही बोललो आहोत. सर्व भारतीयांना युद्धग्रस्त युक्रेनमधून लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढण्यासोबतच नवीनचा मृतदेह आणण्याचेही आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Ti38dvA
No comments:
Post a Comment